बल्लारपूर नगर परिषदेचा अर्थसंकल्प सादर, बल्लारपुर नगर परिषदेचा रु.28,59,232/- लक्ष अखेरच्या शिल्लकीचा अर्थसंकल्प ! Presenting the budget of Ballarpur Nagar Parishad, Ballarpur Nagar Parishad's final balance budget of Rs.28,59,232/- lakhs !
बल्लारपूर :- बल्लारपुर नगर परिषदेने नगर पालिका अधिनियम 1965 चे कलम 101 तसेच 101 अ तरतुदी नुसार तयार केलेले सन 2023-24 चे अर्थसंकल्पीय रु. 137,33,06,009/- कोटी रुपयाचे अंदाजपत्रक आज दि. 27-02-2023 रोजी न.प. सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित करुन, मा. श्री. विशाल वाघ मुख्याधिकारी तथा प्रशासक, लेखापाल श्री. राजेश बांगर व न. प. अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थितीत मंजुर करण्यात आले. या अर्थसंकल्पामध्ये बल्लारपुर नगर परिषदेने लोकहिताच्या दृष्टीकोनातून व विकासाचे दृष्टीने बल्लारपुर शहराचे विकास कामाकरिता प्राधान्य खर्चाच्या प्रमुख बाबी अर्थसंकल्पात नमुद केल्या आहेत. यामध्ये दिव्यांगाकरिता 5% निधी रु. 25,36,686/-, दुर्बल घटकांकरिता 5% 25,36,686 /- महिला व बालकल्याण विकासाकरिता 5% 25,36,686 /-, शिक्षणाकरिता 5%, रमाई आवास योजनेकरिता कोटीची तरतूद, प्रधानमंत्री आवास योनेकरिता 22 लक्ष तरतुद, दलीत बस्ती सुधार योजनेसाठी 15.02 कोटीची तरतुद, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शहरातील वाढीव पाणि पुरवठा योजना व सांडपाणि व्यवस्थापनासाठी (STP) तसेच शहरातील नागरिकांना 24 तास पाणि पुरवठा व्हावा यासाठी 19 कोटीची तरतुद, सार्वजनिक शौचालय, बायोगॅस प्रकल्प, स्वच्छतेच्या सोयीसुविधा व जनजातीसाठी 1.35 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. बल्लारपूर शहराचा संपूर्ण विकास करण्याकरिता रस्ते, भुमीगत गटारे, चौका चौकाचे सौदर्यीकरण, प्रत्येक वार्डात विदयुत व्यवस्था याबाबत भरीव तरतुद करण्यात आली आहे व बल्लारपुर शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी होमोपॅथीक आरोग्य केंद्राकरिता विशेष तरतुद करण्यात आलेली आहे.
हरित शहर व स्वच्छ शहर अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे बळकटीकरण, वृक्षरोपन, हरित पट्ट्याचा विकास, होर्डींग मुक्त शहर यारिता तरतुद करण्यात आली असुन शहरातून निघणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे करिता मलनिस्सारण प्रकल्प महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत राबविण्यात येणार आहे. शहरातील युवकांकरीता स्पर्धा परिक्षा व वाचनालयाकरिता पुस्तके खरेदी याकरीता 8 लक्ष रु.तरतुद करण्यात आली. तसेच 7 वे वेतन आयोगाकरिता 3 कोटी व कर्मचारी आरोग्य विमा करिता 3.25 लक्ष रु. तरतूद करण्यात आली. अशा प्रकारे बल्लारपुर न.प.ने तयार केलेल्या सन 2022-23 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक श्री. विशाल वाघ, मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी विशेष सभेसमोर सादर केले व लेखापाल श्री. राजेश बांगर यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. प्रारंभिक शिल्लकेसह एकुण संभाव्य उत्पन्न रु. 137,61,65,241/- एकुण संभाव्य खर्च रु. 137,33,06,009/- तर अखेरची शिल्लक रु. 28,59,232/- या बाबत सविस्तर माहिती मा. श्री. विशाल वाघ मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी सभेला समजावून सांगितली व सदर सभेनी सन 2023-24 च्या अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान केली. अंदाजपत्रकिय सभेचे संचालन कार्यालय अधिक्षक कु. संगिता उमरे यांनी केले.
संपादक - दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments