मोठी बातमी ! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, यापुढे समितीद्वारे होणार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची निवड (Big news ! The Supreme Court's big decision, henceforth the selection of the Chief Commissioner of the Central Election Commission will be done by the committee)
नवी दिल्ली :- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अलिकडील अनेक निकालांनंतर निर्माण झालेले प्रश्न आणि विश्वासार्हता यावर होणारी चर्चा पाहता या चर्चेच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबत सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला. त्यानुसार आता आयुक्तांच्या निवडीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश हे असणार आहेत. याचाच अर्थ आता आयुक्तांची निवड ही यापुढे केंद्र सरकारद्वारे न होता, त्यासाठी पंतप्रधान, संसदेतील विरोधीपक्ष नेते आणि सरन्यायाधीश यांची समिती असेल. राष्ट्रपती समितीद्वारे प्रस्तावित नावाला मंजुरी देतील. एकंदरीत शिवसेना पक्षाच्या बाततीत आयोगाने दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यावर सातत्याने होणारी चर्चा यावर आता थेट सर्वोच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments