धक्कादायक ! चंद्रपुरात पोलीस कर्मचाऱ्यांची गळफास घेवून आत्महत्या (Shocking! Police personnel committed suicide by hanging in Chandrapur)
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील घुटकाळा प्रभागात वास्तव्यास असलेले व पोलीस दलात कार्यरत असलेले सुशील कुंभलवार वय - 43 वर्षे यांनी आपले राहते घरी सकाळी घरी कुणीही नसल्याची संधी साधत गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी घटनास्थळाला भेट दिली. विशेष म्हणजे त्यांनी आत्महत्या का केली याबाबतचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत सेवा देऊन जवळपास 2 वर्षांपूर्वी त्यांची राजुरा पोलीस स्टेशनला बदली झाली होती मात्र जवळपास वर्षभरापासून त्यांची प्रकृती बरी नव्हती व अनेक महीने ते रुग्णालयात दाखल असल्याचं वृत्त आहे. नुकतेच काही महिन्यापूर्वी ते सेवेत रुजू झाले होते. मात्र आज सकाळी घरी कुणीही नसल्याचे पाहून त्यांनी आत्महत्या करण्यासारखं धक्कादायक पाऊल उचललं या घटनेने चंद्रपूर पोलीस दल हादरून गेलंय असून चंद्रपुर शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चंद्रपुर शहर पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments