बल्लारपुरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी, ढोल ताशाच्या गजरात महाराजांना मानवंदना ! (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebrated with enthusiasm in Ballarpur, people saluted Maharaj in the sound of drums!)
बल्लारपूर :- महाराष्ट्र ज्यांच्या स्वराज्याच्या कार्याने ओळखला जातो ज्यांच्या राज्यात वर्णव्यवस्थेला थारा नव्हता असे बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती या निमित्ताने बल्लारपूर शहर हें भगवामय झाल्याचे दिसून येत आहे अनेक शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन केले. बल्लारपूर नगर परिषदेच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला शासकीय मानवंदना म्हणुन नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी मा. विशाल वाघ यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी उपमुख्याधिकारी जयवंत काटकर, कार्यालयीन अधिक्षक संगीता उमरे यांच्या सह नगर परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यगीत असलेले " जय जय महाराष्ट्र माझा " हे गीत सामूहिक रित्या गायनात आले तदनंतर बल्लारपूर शहरातील हिरकणी ढोल ताशाच्या पथकाने ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले व महाराजांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी केली. यासोबतच संत तुकाराम महाराज सेवा मंडल, मराठा सेवा संघ सह विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना ई नी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने अभिवादन केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068
Post a Comment
0Comments