"जय जय महाराष्ट्र माझा" या महाराष्ट्र गीताचा चंद्रपूर नगरी तुन शुभारंभ, पुढील वर्षभरात महाराष्ट्रात " जाणता राजा " या नाटकाचे निशुल्क नाट्यप्रयोग ("Jai Jai Maharashtra Mazha" Maharashtra Song Launched in Chandrapur City, Free Theater Trial of "Janata Raja" in Maharashtra next year)

Vidyanshnewslive
By -
0

"जय जय महाराष्ट्र माझा" या महाराष्ट्र गीताचा चंद्रपूर नगरी तुन शुभारंभ, पुढील वर्षभरात महाराष्ट्रात " जाणता राजा " या नाटकाचे निशुल्क नाट्यप्रयोग ("Jai Jai Maharashtra Mazha" Maharashtra Song Launched in Chandrapur City, Free Theater Trial of "Janata Raja" in Maharashtra next year)

चंद्रपूर :- सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने कविवर्य राजा बढे लिखीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गिताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला व त्याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. त्यानुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या राज्यगीताचा शुभारंभ चंद्रपूर नगरीतून होत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या राज्यगीताचा अधिकृत शुभारंभ झाला, असे घोषित करून मुनगंटीवार म्हणाले, सामान्य प्रशासन विभागाच्या १ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयान्वये, महाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे. शिवजयंती हा केवळ एक उत्सव नव्हे तर छत्रपतींच्या ३५० व्या राज्यभिषेकाच्या पर्वावर रयतेचे राज्य आणण्यासाठी संकल्प करण्याचा हा दिवस आहे. या राज्यगीताचा प्रत्येक शब्द पराक्रम जागवतो, गीतामधून विरतेचा मंत्र दिसतो. जगातील सर्वात जास्त वाघ असलेल्या भुमीतून या राज्यगीताचा शुभारंभ होत आहे, याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे. 

         शिवाजी महाराजांचे नाव घेतले तरी रक्तामध्ये चैतन्य निर्माण होते, वीरता जाणवते. शिवाजी महाराज या नावामध्ये एक वेगळीच शक्ती आहे. शिवाजी महाराज हे सर्वधर्माचा सन्मान करणारे राजे होते. त्यांचे आचरण २४ कॅरेट सोन्यापेक्षाही शुध्द होते. शिवाजी महाराजांचा पर्यायी शब्द म्हणजे ‘परीस’ होय.औरंगजेबाची क्रुरता सर्वांना माहित आहे. या क्रुरतेविरुध्द भयमुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी शिवाजी महाराजांची भगवा झेंडा हाती घेतला. चोर वाघनखाने अफझजखानाचे पोट फाडून कोथळा बाहेर काढण्याचे काम महाराजांनी केले. मात्र २९ जुलै १९५३ पासून अफझलखानाचे उदात्तीकरण सुरू झाले. उदात्तीकरण क्रुरतेचे होऊ शकत नाही. विरतेचे होईल. म्हणूनच ५ नोव्हेंबर २०२२ ला राज्याचा सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून आपण गुप्त बैठक घेतली. अफझलखानच्या कबरीजवळ असलेले ०.२२ हेक्टरचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आणि १० नोव्हेंबर २०२२ रोजी अतिक्रमण हटविले. १० नोव्हेंबर हा दिवस निवडण्याचे प्रमुख कारण होते की, याच दिवशी छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. विशेष म्हणजे कबरीजवळील अतिक्रमण हटविण्याच्या सांस्कृतिक विभागाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला. ‘चांदा पासून बांदा’ पर्यंत आणि ‘भामरागड पासून रायगडपर्यंत’ छत्रपतींच्या राज्यभिषेकाचे ३५० वे वर्ष संपूर्ण राज्यभर अतिशय उत्साहात साजरे करण्याचा आपला संकल्प आहे. एवढेच नाही तर आपल्यासाठी प्राणप्रिय व कोहीनुर हि-यापेक्षाही जास्त महत्वाची असलेली शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे इंग्लडवरून भारतात परत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)