चंद्रपूर व लगतचा परिसर बनावट दारूचे केंद्रबिंदू तर ठरत नाही ? वलनी-चकनिंबाळ गावाजवळीत बोर्डागावाजवळ बनावट देशी दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने उध्वस्त केला. (Isn't Chandrapur and the surrounding area the center of fake liquor? The State Excise Department demolished a fake country liquor factory near Bordagaon near Valni-Chaknimbal village.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर व लगतचा परिसर बनावट दारूचे केंद्रबिंदू तर ठरत नाही ? वलनी-चकनिंबाळ गावाजवळीत बोर्डागावाजवळ बनावट देशी दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने उध्वस्त केला. (Isn't Chandrapur and the surrounding area the center of fake liquor?  The State Excise Department demolished a fake country liquor factory near Bordagaon near Valni - Chaknimbal village.)

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी होण्यासाठी सर्वात मोठा लढा उभारणाऱ्या श्रमिक एल्गार संघटनेचे मुख्यालय असलेल्या मुल तालुक्यातील चीतेगाव येथे अवैध देशी दारू निर्मितीच्या मोठ्या कारखान्यावर धाड घालुन राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. ह्या प्रकरणात विशिष्ट राजकीय नेत्यांचे अर्थपुर्ण आशीर्वाद असल्याची जोरदार चर्चाही जिल्हाभर सुरू होती. ह्या कारवाई नंतर अवैध बनावट देशी दारूवर अंकुश बसेल अशी अपेक्षा असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुल तालुक्यातच पुन्हा एकदा मोठी कारवाई करत परत एकदा बनावट देशी दारू निर्मिती कारखाना उध्वस्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक चंद्रपुर गडचिरोली कार्यालयाला मुल तालुक्यातील चक बोर्डा गावातील ललिता प्रेमानंद कांबळे ह्यांच्या चाक मोड येथिल मालकीच्या शेतातील घरात मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू तयार करून खऱ्या दारूच्या बाटली प्रमाणे वेष्टन लाऊन विविध ठिकाणी ही बनावट देशी दारू विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. 

         आज दिनांक १७/०२/२०२३ रोजी मौजा वलनी-चकनिंबाळा मार्गावरील चक मोड, ता.जि. चंद्रपुर या ठिकाणी बनावट देशी दारु निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून बनावट देशी निर्मातीचा कारखाना उद्धस्त करण्यात आला. सदर गुन्यामध्ये एकूण १,५३,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व घटनास्थळी उपस्थित शशिम प्रेमानंद कांबळे याला अटक करून मुंबई दारुबंदी कायदा १९४९ व भा.दं.वि. सहिता चे कलम ३२८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदरची कारवाई ही डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, सुनिल चव्हाण संचालक (अंव द.) महाराष्ट्र राज्य मुंबई, अनिल चासकर, विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क नागपुर विभाग नागपुर, संजय पाटील, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली ईश्वर एन. वाघ निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक चंद्रपुर, अमित वा क्षिरसागर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक चंद्रपुर, अभीजीत लिचडे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुर शहर, संदीप राउत, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुल, तसेच जवान चंदन भगत, अजय खताळ, किशोर पेदुजवार, जगदीश कापटे चेतन अवचट, प्रविकांत निमगडे, अमोल भोयर, जगन पडुलवार, संदीप राठोड यांनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास अमित वा क्षिरसागर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक चंद्रपुर करीत आहेत. बनावट देशी दारू तयार करून विक्री करण्याकरिता कारखान्यात असलेली एक कॅप सिलींग मशीन, स्टॅम्प प्रिंटींग मशीन, देशी दारुच्या 240 सिलबंद बॉटल, दारूच्या नावाचे प्रिंट असलेली 10500 बुच,  प्रिंट नसलेली 1500 बुचे, प्रिंटर साठी वापरण्यात येणारी ०१ बॉटल शाई, थिनर, टेपपट्टी प्रत्येकी एक, ०५ कॅन प्लॅस्टीकचे कॅन, खरड्याचे पुठ्ठे, हायड्रोमीटर (दारु मिश्रणाची तीव्रता मोजण्यासाठी), देशी दारूच्या 300 रिकाम्या बॉटल, रेफ्रीजरेटर, सुझुकी कंपनीची ओमनी चारचाकी वाहन, मोबाईल प्रत्येकी एक असा एकुण १,५३,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)