ब्रेकिंग न्युज ! निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं (Breaking news! Election Commission's big blow to Uddhav Thackeray; Eknath Shinde got Shiv Sena and Dhanushya ban)
मुंबई :- शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे. मात्र या निर्णया विरोधात उध्दव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतो तसेच खा. संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त करतांना म्हंटल की 'असत्य मेव जयते ' तसेच आमचा न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास असून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहतोय
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments