मनू भाकर सह प्रविण कुमार, हरमनप्रित सिंग डी. गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले जाणार, 17 जानेवारी 2025 ला रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुच्या हस्ते होणार गौरव (Pravin Kumar with Manu Bhakar, Harmanpreet Singh d. Gukesh will be honored with the Major Dhyan Chand Khel Ratna Award 2024, to be conferred by President Draupadi Murmu on 17 January 2025.)
वृत्तसेवा :- बुद्धिबळ विश्वविजेता डी गुकेश, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले जाणार आहे. क्रीडा मंत्रालयाने 2 जानेवारी 2025 रोजी ही घोषणा केली. सर्व विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात येईल. क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, क्रीडा पुरस्कारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींचे परीक्षण आणि तपासणी केल्यानंतर सरकारने खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या एकूण 32 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 17 पॅरा ॲथलीट आहेत. समित्यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे सरकारने मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना खेलरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मनू भाकरचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केले नव्हते, त्यामुळे वाद झाला होता. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 2 पदके जिंकून इतिहास रचला होता. एकाच ऑलिम्पिकमधील एकेरी स्पर्धांमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. तर हरमनप्रीत सिंगने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदक जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ होती. तर डी गुकेश हा काही आठवड्यांपूर्वीच बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला होता. त्याने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी जगज्जेतेपद मिळविले होते. प्रवीण कुमारने पॅरालिम्पिकच्या T64 प्रकारातील उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024
1) गुकेश डी (बुद्धिबळ)
2) हरमनप्रीत सिंह (हॉकी)
3) प्रवीण कुमार (पॅरा-ॲथलेटिक्स)
4) मनु भाकर (शूटिंग)
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार
1) ज्योती येराजी (ऍथलेटिक्स
2) अन्नू राणी (ऍथलेटिक्स)
3) नितू (बॉक्सिंग)
4) सविती (बॉक्सिंग)
5) वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6) सलीमा टेटे (हॉकी)
7) अभिषेक (हॉकी)
8) संजय (हॉकी)
9) जर्मनप्रीत सिंह (हॉकी)
10) सुखजीत सिंह (हॉकी)
11) राकेश कुमार (पॅरा-तिरंदाजी)
12) प्रीती पाल (पॅरा-ॲथलेटिक्स)
13) जीवनजी दीप्ती (पॅरा-ॲथलेटिक्स)
14) अजित सिंह (पॅरा-ॲथलेटिक्स)
15) सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा-ॲथलेटिक्स)
16) धरमबीर (पॅरा-ॲथलेटिक्स)
17) प्रणव सूरमा (पॅरा-ॲथलेटिक्स)
18) एच होकातो सेमा (पॅरा-ॲथलेटिक्स)
19 सिमरन (पॅरा-ॲथलेटिक्स)
20) नवदीप (पॅरा-ॲथलेटिक्स)
21) नितेश कुमार (पॅरा-बॅडमिंटन)
22) सुश्री तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा-बॅडमिंटन)
23) नित्या श्री सुमथी सिवन (पॅरा-बॅडमिंटन)
24) मनिषा रामदास (पॅरा-बॅडमिंटन)
25) कपिल परमार (पॅरा-जुडो)
26) मोना अग्रवाल (पॅरा-शूटिंग)
27)सुश्री रुबिना फ्रान्सिस (पॅरा-शूटिंग)
28) स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
29) सरबज्योत सिंह (शूटिंग)
30) अभय सिंह (स्क्वॅश)
31) साजन प्रकाश (स्विमिंग)
32) अमन (कुस्ती)
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या