चंद्रपूर :- किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असताना त्यांनी चंद्रपूर विधानसभेचा प्रचंड मोठा विकास केलेला आहे. आता ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही किशोर जोरगेवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून पाठवल्यास या विधानसभेचा चेहरा मोहरा बदलेल हा माझा विश्वास आहे. चंद्रपूर विधानसभा नव्हे तर चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील नंबर एकचा समृद्ध व संपन्न असा जिल्हा होईल असा विश्वास आज गडकरी यांनी व्यक्त केला. चंद्रपूर विधानसभा अंतर्गत असलेल्या घुघुस येथे आयोजित किशोर जोरगेवार यांच्या प्रचार सभे करिता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आज घुघुस येथे आले होते. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत आमदार किशोर जोरगेवार, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, ओबीसीचे ज्येष्ठ नेते अशोक जीवतोडे, आदिलाबाद चे खासदार नागेश गोडाम, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष नितीन भटरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे, महिला जिखा प्रमुख प्रतिमा ठाकूर, महानगर जिल्हाध्यक्ष भारत गुप्ता, विवेक बोढे, आशिष माशिरकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की आपल्याला जेव्हा आजार होतो तेव्हा आपण सर्वोत्तम डॉक्टर कोणता आहे हे पाहून त्यांच्याकडे उपचार घेत असतो. त्यामुळे आता निवडणुकीमध्ये सुद्धा जात-पात धर्म ,पंथ न पाहता किशोर जोरगेवार यांच्यासारखा सर्वोत्तम नेता आपण निवडायला हवा. इतर वेळेस आपण कधीही जात पाहत नाही तर निवडणुकीच्या वेळेस आपण जात पाहून मतदान का करायचे? असा प्रश्न नितीन गडकरी यांनी उपस्थितांना केला. भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर या देशामध्ये 67 योजना कार्यान्वित आहेत आणि राज्याच्याही विविध योजना आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेत असताना कोणत्याही जात-पात धर्म, पंथाचा विचार न करता या योजना सगळ्यांना लागू केल्या जातात. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात सुद्धा या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी शेवटच्या माणसाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी रेकॉर्ड ब्रेक करत किशोर जोरगेवार यांना आपण निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने संविधान बदलणार हा खोटा प्रचार करत लोकांची दिशाभूल केली. वास्तविक पाहता आणीबाणीच्या काळामध्ये आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाने संविधानात सगळ्यात जास्त बदल केले असून आज हाच पक्ष संविधान बदलण्याची भीती लाल संविधानाची प्रत हातात घेऊन लोकांना दाखवतो आहे. संविधानात कोणीही बदल करू शकत नाही. संविधानातील मूलभूत तत्व याला कोणीही बदलू शकत नाहीत. आणि आम्ही ते बदलवू सुद्धा देणार नाही . त्यामुळे नागरिकांनी आता या खोट्या प्रचाराला बळी न पडता योग्य उमेदवार व योग्य पक्ष निवडून देणे या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली गरज आहे असे मनोगत यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केले काँग्रेसने 65 वर्षात जे काम केले नाही ते भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षात केलेले आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध योजना देशाच्या मूलभूत सोयी सुविधा आणि युवकांना रोजगार मिळेल अशा दृष्टिकोनातून विविध प्रकल्प येणाऱ्या काळात निर्माण होत आहेत. देश आज विकासाच्या दिशेने जातो आहे. त्यामुळे आपणही मतदान करत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या सरकारला मतदान करावे असे आवाहन गडकरी यांनी केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची अनेक वर्षापासून इच्छा होती. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने हा योग जुळून आला असे भावनिक मत व्यक्त केले. अपक्ष असतानाही सरकारच्या सोबत असल्याने या विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मला मिळाली. घुग्गुस ग्रामपंचायत ला नगरपरिषद चा दर्जा मिळावा अशी येथील नागरिकांची ईच्छा होती. त्यादृष्टीने काम पूर्णत्वाला नेण्याचा मी प्रयत्न केला त्याला यश मिळाले. शिवाय ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती तथा उड्डाणपूल निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे काम पूर्णत्वाला जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपला आशीर्वादाचा हात माझ्या पाठीशी असाच कायम राहावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. निवडणुकीनंतर चंद्रपूरला मिळणार फ्लाय ओव्हर चंद्रपूरच्या वाहतूक समस्ये बाबत आमदार किशोर जोरगेवार हे माझ्याशी नेहमीच चर्चा करीत असतात. या समस्येवर आपण उपाय काढावा याबाबतही त्यांनी मला बरेचदा सांगितले आहे. त्या दृष्टीने चंद्रपूरला निवडणूकीनंतर लवकरच नवीन फ्लाय ओव्हर बांधण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. पडोली समोरून बंगाली कॅम्प असा हा फ्लाय ओव्हर असणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments