चंद्रपूर :- विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला अन सोशल मिडीया कमालीचा एक्टिव्ह झाला. एरव्ही ओसाड व भकास दिसणारे WhatsApp ग़ुप, Facebook व Twitter व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्याची पायमल्ली करून सोशल मिडीयावर कमालीचे तुटून पडले आहेत. विधानसभा निवडणुकीला तमाशाचा फड समजून टाकण्यात येणाऱ्या पोष्ट ' वात्रटपणा' या सदराखाली मोडत असून यामुळे सुज्ञ मतदार कमालीचे बेजार झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. निवडणूक काळात उमेदवार सुद्धा विरोधक उमेदवाराचा, चिन्हाचा आदर करतात. वैयक्तिक टिका, निवडणूक चिन्हाचा अनादर न करता विरोधी पक्ष वा विरोधी उमेदवारांच्या धोरणाविरोधात बोलून आपणच सबळ असल्याचे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात. याउलट मात्र अनेक छुटभैये, चाटूगिरी करणारे अतिउत्साही कार्यकर्ते मात्र या विधानसभा निवडणुकीत सोशल मिडियाचा वापर अक्षरशः राजकीय वात्रटपणा करण्यासाठी शर्यतीत उतरल्याने मोठा गोंधळ उडू लागल्याचे भयावह चित्र दिसू लागले आहे. यामुळे मतदारांमध्ये निवडणुकीबाबत नकारात्मकता पसरून यांमुळे मतदानाचा टक्का गोत्यात येण्याचीच जास्त शक्यता असून याचा फटका या अतिउत्साही कार्यकर्तेच्या पक्ष वा उमेदवारास बसण्याची शक्यता सुज्ञ मतदार व्यक्त करताना दिसतात या विधानसभा निवडणुकीत सोशल मिडियाचा वापर मतदानाचा टक्का वाढविणे,आपला पक्ष वा उमेदवार यांच्या ध्येय धोरणांचा प़चार,प़सार करणे यासाठी कमी व विरोधी पक्ष, उमेदवार,अपक्ष यांच्या चिन्हाचा अपमान करणे, व्ययक्तीक टिका करणे, निंदानालस्ती करणे , व्ययक्तीक रोष दाखविणे यासाठी अधिक होत असून यामूळे निवडणूक संपल्यानंतरही कंलह वाढणार असल्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. यात WhatsApp ग़ुप' वात्रटपणा' च्या विळख्यात गोवले गेले असून अनेकांनी एकतर या काळात स्वताला सोशल नेटवर्किंग मधून बाहेर काढणे पसंत केले आहे मतस्वातंत्र्याचा अधिकार सर्वाना आहे मात्र तो संविधानाचे अधीन राहून आहे हे छुटभैये, चाटूगिरी करणारे अतिउत्साहाचे आहारी जाऊन विसरतात व यातून आपल्या उमेदवाराचे वय लोकशाहीचे मोठे नुकसान तर करतातच अन् संविधानाचा अवमान सुद्धा करतात असे जाणकाराना वाटल्यास नवल नसावे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments