नारा बुलंद होऊ लागला, " पुन्हा एकदा सुधिर भाऊ " The slogan began to rise, "Once again Sudhir bhau ".

Vidyanshnewslive
By -
0
नारा बुलंद होऊ लागला, " पुन्हा एकदा सुधिर भाऊ " The slogan began to rise, "Once again Sudhir bhau ".


मूल :- अंधारी नदीपात्रात धरणांची शुंखला उभारण्याचे भा.ज.पा.उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांचे आश्र्वासन बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बळीराज्यास सुखावणारा ठरला आहे. सुधिर मुनगंटीवार यांची जनतेशी जुळलेली नाळ यामुळे अधिक घट्ट झाल्याची चर्चा असून ' पुन्हा एकदा सुधिरभाऊ' हा नारा बुलंद होऊ लागला आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस अंतर्गत बंडखोरांनी कांग्रेस उमेदवार संतोष सिंह रावत यांचे विरोधात पेटविलेली मशाल व मतदारांनी विकास दृष्टीक्षेपात ठेवून फुंकलेली तुतारी बघता ' विकासपुरुष' भा.ज.पा.उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांच्या एकेरी विजयाचा मार्ग सुकर झाला आहे असे राजकीय समिक्षक बोलताना दिसत आहेत. गत २० वर्षांपासून बल्लारपूर विधानसभा क्षेत्राशी नाळ जुळलेले व विकासाची दुष्टी जोपासणारे महायुतीचे उमेदवार म्हणून सुधिर मुनगंटीवार यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या कांग्रेस मध्ये उमेदवारी करीता अंतर्गत कुरघोड्या सुरू झाल्याचे चित्र बघावयास मिळाले. कांग्रेसच्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरी करून आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली व इथूनच या विधानसभा क्षेत्रात भा.ज.पा.चा परंपरागत प्रतिस्पर्धी कांग्रेस स्पधैतून बाद झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.  गत २० वर्षांपासून तसेही या विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांची एकतर्फी विजयी यात्रा सुरू आहे. या कालावधीत सुधिर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारात वनमंत्री, अर्थमंत्री, नियोजन, सांस्कृतिक कार्यमंत्री पदावर दुरदुष्टी ठेवून काम करीत राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात या क्षेत्राचा डंका वाजविला आहे हे सर्वश्रुत आहे. बल्लारपूर विधानसभाच नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्हा विकास पटलावर आणून दिल्ली दरबारी इथल्या नेतुत्वाची छाप पाडली आहे. बल्लारपूर विधानसभेचा गड सदैव विकासाच्या चरणात ठेवून पुन्हा एकदा येथील मातीच्या सेवेसाठी मैदानात उतरलेल्या सुधिर मुनगंटीवार यांच्या पराभवासाठी करण्यात आलेल्या राजकीय कुरघोड्या विरोधकांनाच भारी पडल्याचे मत संपूर्ण विधानसभा क्षेत्रात व्यक्त होताना दिसते. गत २० वर्षात विधानसभा क्षेत्रात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास साधताना सर्वसमावेशकता असल्याने क्षेत्रातील जाती धर्माच्या पल्याड जाऊन विकासकारण साधणारा जनसेवक म्हणून मुनगंटीवारांचे राजकीय अस्तित्व सजले असे बोलले जाते. या विधानसभा निवडणुकीत अधांरी नदीपात्रात धरणांची श्रुखला उभी करण्याचे आश्वासन देऊन सुधिर मुनगंटीवार यांनी विधानसभा क्षेत्रात हरितक्रांतीची ठेवलेली आस त्यांच्या विकासशील नजरेची साक्ष देत असल्याने क्षेत्रातील बळीराजा सुखावला असून ' पुन्हा एकदा सुधिरभाऊ' असा नारा घेऊन पुढे आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)