महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिहं रावत यांची कॉर्नर सभेच्या माध्यमातून आघाडी (Mahavikas Aghadi candidate Santosh Singh Rawat's lead through corner meeting)

Vidyanshnewslive
By -
0
महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिहं रावत यांची कॉर्नर सभेच्या माध्यमातून आघाडी (Mahavikas Aghadi candidate Santosh Singh Rawat's lead through corner meeting)


बल्लारपूर :- बल्लारपूर विधानसभा निवडणूक २०२४ एकतर्फी वाटणारे वातावरण आजता रोमांचकारी स्थितीत पोहोचले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांनी आपला प्रचार तीव्र केला आहे. पदयात्रा, नुक्कड सभा, कॉर्नर सभा, प्रभात फेरी या माध्यमातून प्रचारात वाढ झाली आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीला बगल देत सर्व काँग्रेस नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्यात संतोषसिंह रावत यांना यश आले आहे. आज काँग्रेसचा प्रत्येक नेता आपापल्या तक्रारी विसरून संतोषसिंह रावत यांच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेला काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा गट एकत्र निवडणूक लढवत आहेत. याशिवाय आम आदमी पार्टी आणि रिपाई गवई गटानेही पाठिंबा जाहीर केला आहे. बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना त्यांच्या निवडणूक प्रचारात मित्रपक्षांच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राजू काबरा, शिवसेना उबाठा गट जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, सिक्की यादव आणि आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर रायकवार, ॲड किशोर पुसलवार तसेच आंबेडकरी कार्यकर्ता पवन भगत आणि त्यांचे कार्यकर्ते  हे सर्वजण संतोषसिंह रावत यांचा विजय करीता शक्ती वापरत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील सामंजस्य प्रचार सभेत दिसून येत आहे. तसा सामंजस्य महायुतीतील घटक पक्षांमध्ये दिसत नाही. २० नोव्हेंबर ला होणाऱ्या मतदानात सर्व घटकांचा दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय पाठिंबा मिळेल आणि ३० वर्षांच्या वनवासातून दिलासा मिळेल, असा विश्वास संतोषसिंह रावत यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)