अपक्ष उमेदवार असलेल्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांना समाजातील विविध सामाजिक संघटनाचा वाढता पाठिंबा (Independent candidate Dr. Abhilasha Gavture is getting increasing support from various social organizations in the society)

Vidyanshnewslive
By -
0
अपक्ष उमेदवार असलेल्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांना समाजातील विविध सामाजिक संघटनाचा वाढता पाठिंबा (Independent candidate Dr. Abhilasha Gavture is getting increasing support from various social organizations in the society)


बल्लारपूर :- बल्लारपूर विधानसभा क्षेत्र सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलेला आहे. येथील सुपरिचित सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांना काँग्रेसचे उमेदवारी निश्चित समजली जात असताना ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापून मतदारसंघात काहीसे परिचित नसलेले संतोष रावत ह्यांना देण्यात आली. या बैठकीला ओबीसी ,दलित, आदिवासी मतांवर प्रभाव पाडणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांचे सुमारे चारशे हून अधिक प्रतिनिधी त्यांच्या समर्थनात या बैठकीला हजर होते. सध्या डॉ. अभिलाषा गावतुरे या अपक्ष आमदार म्हणून बल्लारपुर विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढवीत आहेत. एखाद्या अपक्ष  उमेदवारीला सर्व स्थरातील समाजिक कार्यकर्त्यांनि एकजुटीने हजर असणे ही एक ऐतिहासिक घटना समजल्या जात आहे आणि त्यामुळे  डॉ. अभिलाषा गावतुरे ह्यांचा विजय निश्चित समजल्या जात आहे. त्यामुळे त्यांची उपस्थिती  व पाठिंबा हे डॉ.अभिलाषा साठी वरदान ठरणार यात काही शंका नाही. मुल- बल्लारपूर क्षेत्राचे  विद्यमान आमदार  सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करण्याची क्षमता केवळ डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यात असूनही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आणी त्यामुळे संतोष रावत हे मंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांचे डमी उमेदवार असल्याचा स्पष्ट आरोप या बैठकीत ठेवण्यात आला. 
           केवळ धनशक्ती च्या जोरावर रावत ह्यांना उमेदवारी देण्यात आली. डॉ. अभिलाषा यांना उमेदवारी मिळावी अशी जनमाणसाची भावना असताना सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. याचा रोष बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांनीच पुढाकार घेऊन डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी येथील मोठ्या हॉटेल मध्ये एक चिंतन बैठक बोलवण्यात आली. विशेष म्हणजे काँग्रेसनी ज्यांना चंद्रपूर विधानसभेची उमेदवारी नाकारली असे अपक्ष उमेदवार राजू झोडे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. मागील निवडणुकीत बल्लारपूर विधानसभेत त्यांनी चाळीस हजार मते घेतली होती. म्हणून डॉ. अभिलाषा गावतुरे या अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी सर्व सामाजिक संघटनांनी ठामपणे उभे राहून सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांचा प्रसार प्रसार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार व दलित मित्र डी. के. आरिकर, सत्यशोधक समाजाचे हिराचंद बोरकुटे, भीम आर्मी चे सुरेंद्रभाऊ रायपुरे, सोशल इज्युकेशन चे भास्कर मून, एडवोकेट प्रशांत सोनुले, प्रा. माधव गुरनुले, हेल्पिंग हँडस फाऊंडेशन चे अजय दुर्गे तसेच सुभाष रत्नपारखी,विशाल जुमनाके, बाबुराव ठाकरे, बेलदार समाजाचे डॉक्टर राजू ताटेवार, जीवन उमरे,गिरीधर लांबट, अंकुश वाघमारे , गुलजार रायपूरे, ऋषी कोटनाके, कार्तिक बोरकर,हरिदास उराडे, शंकर बागेसर मुकुंदा आंबेकर, देविदास रामटेके,सुधाकर रामटेके, लोकेश्वर कोटरंगे, दशरथ पेंदोर, मुन्ना आवळे, डॉ. महेश भांडेकर, यशोधरा पोतनवार व वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, वकील तथा प्राध्यापक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)