बल्लारपूरात महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिहं रावत यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन (Inauguration of Mahavikas Aghadi candidate Santosh Singh Rawat's campaign office in Ballarpur)
बल्लारपूर :- बेरोजगारांना रोजगार आणि शेतक-यांसाठी सिंचनाची व्यवस्था न करता विकासाची वल्गना करणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला जाब विचारण्याची गरज असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मन आणि मतभेद विसरून एकदिलाने महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या विजयासाठी परिश्रम घ्यावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गि-हे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केले.
बल्लारपूर येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी खा. प्रतिभाताई धानोरकर, विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार, आ. सुभाष धोटे, माजी आमदार जेनुद्दीन जव्हेरी, आ. सुधाकर आडबले, राजेंद्र वैद्य, संदीप गिरे, पवन भगत, एड. रवी पुसलवार, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, देवेंद्र आर्य, यांच्या सह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. त्यामूळे विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत सक्षम असल्याने त्यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यानी प्रामाणीकपणे प्रयत्न करून त्यांना विजयी करावे. अशी विनंती राकाॅंपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गि-हे यांनी शिवसेनेच्या समस्त कार्यकर्त्यानी महाविकास आघाडीच्या निर्मिती संबंधी पक्षश्रेष्ठीनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करून महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या विजयासाठी पक्षकार्ये समजून नेटाने कामाला लागावे. असे आवाहन केले.
यावेळी रिपाईचे पवन भगत यांनीही संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीच्या विजयाची नितांत गरज असून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यास संविधानाचे रक्षण झाल्याशिवाय राहणार नाही. असे सांगून राहुलजी गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी रिपाईच्या समस्त कार्यकर्त्यानी संतोषसिंह रावत यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. अशी विनंती केली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांनी निवडणुकीचा प्रचार करतांना वेळे अभावी आपल्या पर्यंत पोहोचू शकलो नाही तर कृपया गैरसमज न करता प्रचार यंत्रणा थांबवू नये. अशी विनंती केली. सभेचे संचालन अब्दुल करिम भाई यांनी तर एड पवन मेश्राम यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार जेनुद्दीन जव्हेरी यांची घरवापसी तर अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments