चंद्रपूर :- बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात उभे असलेल्या सर्व उमेदवारांचा आपण आदर करते मात्र आपली मुख्य लढत भाजप उमेदवार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचेशी असल्याचे बहुचर्चित अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतूरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कांग्रेसने आपणास उमेदवारी नाकारली असली तरी गत अनेक वर्षांपासून क्षेत्रात सुरू असलेले आपले काम व जनतेशी जुळलेली नाळ व बहुसंख्य जनतेने घातलेली गळ यामुळे आपण पुणं ताकदीने निवडणूक लढत असल्याचे त्यानी यावेळी स्पष्ट केले वनमंत्री व पालकमंत्री म्हणून मुनगंटीवार यांनी जनतेला न्याय न दिल्याने वाघ मानव संघर्ष, चराईचा प्रश्न, घरकुलांबाबतची अनियमितता, स्थानिक बेरोजगारी असे अनेक प्रश्न जास्त चिघळले असून शासकिय पैशाचा वापर जनसमस्या सोडविण्याऐवजी बिनकामी दिखाऊपणात उधळण्यात आल्याचा आरोपही डॉ.अभिलाषा गावतूरे यांनी यावेळी केला.
निवडणूक जिंकल्यानंतर आपण पुरोगामी विचारधारा जोपासणाऱ्या पक्षाला सहकार्य करणार असून आपणास विधानसभा क्षेत्रात मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे आपण प्रचंड आशावादी आहोत व मतदारांचे हे प्रेम भविष्यात जनसेवेची उजॉ ठरणार असल्याची ग्वाही त्यानी यावेळी दिली. " एकच आशा डॉ.अभिलाषा" या घोषणांनी दुमदुमली तालूका. विधानसभा क्षेत्रात सर्व उमेदवारांनी सभा व शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतूरे यांच्या मूल तालुक्यातील विवीध गावांमध्ये झालेल्या सभांमध्ये " एकच आशा डॉ. अभिलाषा" ही घोषणा चचैचा विषय ठरली आहे. काल मूल शहरात निघालेल्या हजारोंच्या रॅलीने व यात " एकच आशा डॉ. अभिलाषा "या घोषणेने मूल शहर दुमदुमले. या रॅलीत तालुक्यातून हजारोंच्या संख्येने सर्वधर्मिय नागरीक, युवा- युवती, सामील झाले होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments