चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कामे, ऊर्जानगरचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी कटिबद्ध, ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास (Important works for overall development of Chandrapur district, determined to change the face of Urjanagar, Na. Mr. Sudhir Mungantiwar expressed his belief)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कामे, ऊर्जानगरचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी कटिबद्ध, ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास (Important works for overall development of Chandrapur district, determined to change the face of Urjanagar, Na. Mr. Sudhir Mungantiwar expressed his belief)


चंद्रपूर : महायुतीच्या सरकारने राज्यात विकासाची गंगा आणली. राज्य विकासाच्या बाबतीत पुढे नेण्याची क्षमता महायुती सरकारमध्ये आहे. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून अनेक महत्त्वपूर्ण योजना, प्रकल्पांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता काम केले. येत्या काळात ऊर्जानगर परिसराचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ऊर्जानगर कॉलनी येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. सी.एस.टी.पी.एस. (CSTPS) येथे विद्युत निर्मितीचा 8वा व 9वा संच उभारला. यापुढे 800 मेगावॅट क्षमतेचे दोन संच उभारण्यात येणार आहेत. ऊर्जानगर परिसरात सांस्कृतिक भवन उभारणीसाठी 15 कोटी रुपये मंजूर करून दिले. तर ऊर्जानगरच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच येथील क्वाॅर्टर्सच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. पुढे ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘ऊर्जानगर परिसरात सांस्कृतिक भवन व्हावे ही अनेक दिवसांपासून मागणी होती. या मागणीला अनुसरून सांस्कृतिक भवनासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. दुर्गापुर रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असून या भागामध्ये 'स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र' (PHC) करण्यात येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज अशी व्यायामशाळेचे (जिम) बांधकाम करण्यात आले. चंद्रपुरात भेटीदरम्यान पोलीस महासंचालकांनी सदर जिमच्या बांधकामाचे कौतुक देखील केले. विविध समाजासाठी प्रत्येक गावनिहाय सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात आले.’ येथील ऊर्जानगर वासीयांच्या मागणीनुसार, उर्जानगर कॉलनीतील दुर्गामाता मंदिराच्या शेडचे मजबूत काम करण्यात येणार असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले. रोजगारात अव्वल रोजगाराच्या बाबतीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुढे राहावा यासाठी प्रयत्न होत आहेत. याकरिता चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन (CSTPS), कोल माईन्सला वनविभागाची मान्यता तसेच मुल एमआयडीसी येथे विविध उद्योग उभे राहिले आहेत. त्यासोबतच, येथील कंत्राटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नात वाढ तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 1 मे 1960 पासून ते सन 2013-14 पर्यंत, 1 लक्ष 25 हजार एवढे होते. मात्र, मागील साडेसात वर्षांत महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 2 लक्ष 77 हजार इतके झाले.आज महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात गुजरातपेक्षा पुढे असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले. जिल्ह्याच्या विकासात अनेक महत्त्वपूर्ण कामे जिल्ह्याच्या विकासाकरिता सैनिक शाळा, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, मेडिकल काॅलेज, एस.एन.डी.टी. विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, बसस्थानके, कार्पेट युनिट, पोलीस स्टेशन,सिमेंट रोड, अभ्यासिका तसेच पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना निर्माण करण्यात आल्या आहेत,असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)