फेक नरेटिव्ह'वर विरोधी पक्ष किती दिवस खेळणार ?, चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांचा सवाल (How long will the opposition play on 'Fake Narrative'? Question of the voters of Chandrapur district)

Vidyanshnewslive
By -
0
'फेक नरेटिव्ह'वर विरोधी पक्ष किती दिवस खेळणार ?, चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांचा सवाल (How long will the opposition play on 'Fake Narrative'? Question of the voters of Chandrapur district)


चंद्रपूर :- विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात थेट लढण्याची ताकद नसली म्हणजे काय होते, हे सध्या चंद्रपूर जिल्ह्यात बघायला मिळत आहे. सद्यस्थितीत महायुतीला टक्कर देता येत नाहिये म्हणून महाविकास आघाडी, त्यातल्या त्यात काँग्रेस जुने व्हिडिओ, ऑडिओ काढून भाजप नेत्यांना बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसत आहेत. पण मतदार राजा जागृत झाला आहे. भुलथापांना तो बळी पडणार नाही, असे जाणकार सांगत आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याचा 'न भुतो न भविष्यती' असा विकास केला आहे. हे सांगण्यासाठी आता कुण्या तज्ञाची गरज नाही. ना.मुनगंटीवार यांचे विरोधकही त्यांच्या कामांचे कौतुक खासगीत करतात. पण निवडणुक प्रचारात या विकास कामांचे उत्तर विरोधकांकडे नाही. म्हणून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जुने व्हिडिओ व्हायरल करून अपप्रचार करण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरु आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सैनिकी शाळा ,वन अकादमी, देखनी बसस्थानके, अनेक ठिकाणी ई लायबरी, बॉटनिकल गार्डन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नियोजन भवन, कोषागार भवन, अभ्यासिका, वसतीगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल, वन विभागाची देखनी विश्रामगृहे , इको पार्क, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील काँक्रीट रोड, क्रिडा संकुल अशी मुनगंटीवार यांनी केलेल्या कामांची यादी लांबलचक आहे. तुलनेत काँग्रेस नेत्यांनी काय केले, हे दाखवण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही. म्हणून अपप्रचार केला जात आहे. त्यांनी त्यांचा प्रचार करावा, पण मुनगंटीवार यांचा अपप्रचार करण्याचा अयशस्वी प्रयत्न करू नये, असे लोक आता बोलायला लागले आहेत. कसाही अपप्रचार केला तरी येत्या 20 तारखेला आम्ही खरं काय ते दाखवून देऊ, असेही लोक सांगत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)