एसटी प्रशासनातर्फे 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' हि विशेष मोहीम राबविण्यात येणार (A special campaign 'ST pass direct to your school' will be implemented by the ST administration)
वृत्तसेवा :- एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटीतून विद्यार्थ्यांना 66 टक्के सवलत दिली जात असते. या पाससाठी केवळ 33 टक्के भरुन पास काढता येत असतो. शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे,म्हणजे केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. तर विद्यार्थींना बारावी पर्यंत मोफत एसटी पास मिळत असतो. या विद्यार्थ्यांना आता एसटीने थेट शाळेत पास वितरीत करण्याची योजना आखली आहे. राज्यात एसटी महामंडळाच्या सध्या 16 हजार बसेस असून 87 हजार कर्मचारी सेवा देत आहेत. एसटी महामंडळ अनेक समाज घटकांना सवलतीत प्रवास घडवित असते. या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम सरकार एसटी महामंडळाला परत करीत असते. आता एसटी महामंडळ त्यांच्या शाळा - महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार संबंधित विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देणार आहे. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात 18 जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या