राज्याच्या मुख्य सचिव पदी पहिल्यांदाच महिला अधिकारी, " सुजाता सौनिक " यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती, 1 जुलै रोजी पदभार स्विकारण्याची शक्यता ("Sujata Saunik" appointed as the Chief Secretary of the State for the first time, a woman officer, likely to take charge on July 1)

Vidyanshnewslive
By -
0
राज्याच्या मुख्य सचिव पदी पहिल्यांदाच महिला अधिकारी, " सुजाता सौनिक " यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती, 1 जुलै रोजी पदभार स्विकारण्याची शक्यता ("Sujata Saunik" appointed as the Chief Secretary of the State for the first time, a woman officer, likely to take charge on July 1)


मुंबई :- लोकसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ देण्यात आलेले मुख्य सचिव नितीन करीर हे आज, 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता मुख्य सचिव म्हणून आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात येणार असून हे पद भूषविणाऱ्या त्या राज्याच्या पहिला महिला असतील. विशेष म्हणजे मुख्य सचिव नितीन करीर 31 मार्च रोजी निवृत्त होणार होते. 1 जानेवारी 2023 रोजी त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने नितीन करीर यांच्या मुतदवाढीचा प्रस्ताव दिलेला नव्हता. राज्य सरकारने सुरुवातीला मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला होता. त्या 1 जुलै रोजी अधिकृतपणे मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
               सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) पदावर कार्यरत आहेत. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक सध्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे पती मनोज सौनिकही मुख्य सचिव राहिलेले आहेत. त्यामुळे राज्यातील नोकरशाहीचे नेतृत्व करणारे दाम्पत्य म्हणून त्यांची ओळख निर्माण होईल. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे राज्याच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिलेला संधी मिळेल. यापूर्वी गृहसचिव या पदावर असलेल्या चंद्रा अय्यंगार, चित्कला झुत्शी, मेधा गाडगीळ या तिघीही सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य सचिव पदाच्या दावेदार होत्या. पण त्यांना संधी मिळू शकली नाही.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)