नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील एका पुलावर 16 जून रोजी एका वेगवान खाजगी बसने विरुद्ध दिशेने येत असलेल्या ऑटोरिक्षाला धडक दिल्याने भारतीय लष्करातील एक जवान शहीद झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. कामठी शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील काही सैनिक साहित्य खरेदी करण्यासाठी कन्हानला गेले होते. कामठी शहराजवळील कन्हान नदीच्या पुलावर सायंकाळी 5.30 च्या सुमारास हा अपघात झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कामठी येथील गार्ड्स रेजिमेंट सेंटरमधील 6 जवान ऑटोरिक्षातून प्रवास करत असताना एका वेगवान बसने वाहनाला धडक दिली. एमएच-49/एआर-7433 क्रमांकाचा ऑटो कन्हान नदीच्या पुलावर पोहोचताच, नागपूरहून शिवनी येथे वेगात जाणा-या एमएच-31/एफसी-4157 क्रमांकाच्या खाजगी बसने ऑटोला जोरात धडक दिली. ऑटोतील सैनिकांसह चालक गंभीर जखमी झाला. सैनिकांसह ऑटो चालकाला नागपूर शहरातील मेयो रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले, तर तिघांना कामठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेयो रुग्णालयात एका सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिघांना नागपुरातील मेडिकल हॉस्पिटलच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. या तिघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले आहे,अशी माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी कामठी पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या