महात्मा फुले महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा (Mahatma Phule College celebrated Yoga Day with enthusiasm)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा (Mahatma Phule College celebrated Yoga Day with enthusiasm)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज २१ जून रोजी संपन्न झाला. योग दिन घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी योगा केल्यानंतर योगाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तत्पूर्वी सामूहिक सूर्यनमस्कार करताना विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार अर्थात अष्टांग योगामुळे मानवी शरीरात असणाऱ्या व्याधी कशा दूर होतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. योग दिनाकरिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण व एनसीसी विभागाचे ए.एन.ओ.प्रा. योगेश टेकाडे आणि ग्रंथालय प्रमुख प्रा.डॉ. पंकज कावरे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग चे प्रा.डॉ. बालमुकुंद कायरकर यांच्या नेतृत्वात योग दिन घेण्यात आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)