बल्लारपूर :- दिनांक 21 जुन 2024 वटपोर्णिमा निमित्त बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील पटांगणात वट वृक्षाचे वृक्षारोपन करुन वृक्षाची पुजा अर्चना करुन वटपोर्णिमा साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी श्रीमती. वर्षा नैताम, सहाय्यक पोलीस निरिक्षक बल्हारपुर, रणरागीनी हिरकनी फाऊडेशन चे सस्थापक श्रीमती. नेहा भाटीया, अध्यक्ष श्रीमती. संजना मुलचंदानी, श्रीमती. कोमल पोपली, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश भोवरे व बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनरक्षक कु. वर्षा पिपरे, कु.उषा घोडवे, कु.वैशाली जेणेकर, कु.माया पवार, कु.भारती तिवाडे, कु. राजश्री मुन, कु. प्रियंका अंगलवार, कु. अचर्ना मुलकलवार व स्थानीक महिला श्रीमती. कविता कोंडवत्तुलवार, श्रीमती. सुनिता गोंधळी, श्रीमती. कल्पना भोयर, श्रीमती. जया करकाडे, श्रीमती. शिवानी खारकर, श्रीमती. स्वाती कामले, श्रीमती. भवाणी बत्तलवार, श्रीमती. जयश्री आनकाडे व बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी येत्या वनमहोत्सवात प्रत्येकाने किमान 2 वृक्षांची लागवड करुन त्यांचे संगोपन करण्याची आव्हान वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मार्फत करण्यात येत आहे. अशी माहिती नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह प्रादे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या