बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे आगामी बकरी ईद निमित्त तालुका स्तरीय शांतता समितीची बैठक चे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीत बकरी ईद सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले तसेच ईद नमाज पठणानंतर मुस्लिम रिती नुसार होणारी कुबाऀनी संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेले परिपत्रकात नमूद जनावरांच्या वाहतूकी व कत्तली संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. १७ जुन रोजी होत असलेल्या बकरी ईद निमित्य उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा दिपक साखरे तसेच प्रभारी तहसीलदार सतिश साळवे बल्लारपूर यांचे उपस्थितीत तालुका स्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत डॉ.डी पी. जुमळे पशु वैद्यकीय अधिकारी, बल्लारपूर, जयंत काटकर उप मुख्याधिकारी न.प. बल्लारपूर,जिल्हा शांतता समिती सदस्य काशिनाथ सिंह, नासिर मोहम्मद रहीम बक्स, बल्लारपूर ऍड. हरिश गेडाम रा. बामणी तसेच तालुका स्तरावरील शांतता समिती सदस्य भारत थुलकर, वसंत खेडेकर, राजू झोडे, शिवचंद द्विवेदी, शेख उस्मान शेख गुलजार, नरेश मुंदडा, ताहीर हुसेन, देवेंद्र आर्य, पवन भगत, ऍड. मेघा भाले, आसिफ अब्बास शेख, मनोहर दोतेपल्ली, दिपक भगत, मिनाक्षी गलगट, ज्योती गेहलोत, कल्पना गोरघाटे, राजेश खेडेकर सहित तालुका शांतता समितीचे सदस्य, पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रिडवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोयर, सफौ गजानन डोईफोडे, साईनाथ आत्राम सह पोलीस स्टाफ उपस्थित होते. यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी आपले विविध सूचना व्यक्त केल्यात.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या