डॉ बाबासाहेबांच्या विचारांचेच होणार संवर्धन - डॉ. आंबेडकर स्मारक समितीची भूमिका (Dr. Babasaheb's thoughts will be enriched - Role of Dr. Ambedkar Memorial Committee)

Vidyanshnewslive
By -
0
डॉ बाबासाहेबांच्या विचारांचेच होणार संवर्धन - डॉ. आंबेडकर स्मारक समितीची भूमिका (Dr. Babasaheb's thoughts will be enriched - Role of Dr. Ambedkar Memorial Committee)
दीक्षाभूमीचा विकास व सौंदर्यकरणाच्या नावाने दीक्षाभूमी संपविण्याचे षड्यंत्र आहे का?


नागपूर :-  दीक्षाभूमीचा विकास व सौंदर्यकरणाच्या नावाने दीक्षाभूमी संपविण्याचे षड्यंत्र आहे का दीक्षाभूमी स्मारक समितीने खुलासा करावा दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बांधकामावर सामान्य नागरिकांच्या आक्षेपावर स्मारक समितीने स्पष्टीकरण द्यावे. दीक्षाभूमी वर दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. सद्यस्थितीतील जागा ही येणा-या अनुयायांच्या तुलनेत अत्यंत कमी शिल्लक आहे कारण कॉलेज, खेळाचे मैदान, ऑडिटोरिअम, यात्री निवासच्या नावावर खुराडे बांधून दीक्षाभूमीचा परिसर अगोदरच कमी झालेला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या राज्यांतून, गावातून येणा-या लोकांसाठी तिथे पाय ठेवायला जागा रहात नाही. अशा परिस्थितीत दीक्षाभूमीच्या परिसरात सौंदर्यीकरणाच्या नावाने जमिनीखाली आणि जमिनीवर बांधकाम सुरू केलेले आहे. या बांधकामावरच आमचा आक्षेप आहे. एनआयटी कडून आणि टीव्ही वर सादर केलेल्या जाहिरातीच्या व्हिडिओ वरुन दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंग व अंडरग्राऊंड पाचशे लोकांची बसण्याची व्यवस्था असलेले दोन हॉल बनण्याचे प्रयोजन केलेले आहे. दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंग का व कोणासाठी
दीक्षाभूमीवर वर्षाच्या फक्त काहीच दिवशी अनुयायांची गर्दी असते. जसे धम्मचक्र प्रवर्तन दिन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन, त्यावेळेस गर्दी इतकी जास्त असते की सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुक विभाग आजुबाजूच्या रस्त्यावरची वाहतुक अर्ध्या किलोमीटर अंतरावर थांबवतो. अंडरग्राऊंड पार्किंगचा या दिवसांमध्ये काहीच उपयोग होणार नाही. इतर दिवशी अनुयायींची गर्दी अशी नसतेच. मग गरज नसतांना अंडरग्राऊंड पार्किंग कशासाठी व कोणासाठी करण्यात येत आहे. अंडरग्राऊंड पार्किंगची सोय करायचीच असेल तर ती आयटीआय किंवा माता कचेरी परिसरात करावी पण दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंगची काही एक गरज नाही आहे.भारतातील कोणत्याही धार्मिक स्थळाखाली अंडरग्राऊंड पार्किंग नाही.मग याच ठिकाणी कां?
          बाबासाहेबांची पुस्तके, लेखक-साहित्यिकांची पुस्तके, तथागत आणि बाबासाहेबांच्या मुर्त्या विकण्यासाठी या नवीन प्रस्तावात काही तरतूद केली आहे का याच उत्तर आहे नाही. पुस्तके आणि मुर्ती विकण्यासाठी या प्रस्तावात काहीच तरतूद नाही. दीक्षाभूमीवरून दरवर्षी प्रचंड प्रमाणात पुस्तके, मुर्ती आणि इतर अनेक बौद्ध संस्कृतीच्या प्रतिकांची विक्री होत असते. आणि यासाठी कुठलीच व्यवस्था स्मारक समितीने केलेली नाही. उलट *जिथे पुस्तकांचे स्टाल्स लागतात त्या जागेवर बांधकाम सुरू आहे.* दीक्षाभूमीवरुन पुस्तकांची व इतर साहित्याची विक्रीच होऊ नये असा समितीचा हेतू आहे दीक्षाभूमी हे राष्ट्रीय स्मारक आहे. मग राष्ट्रीय स्मारकाच्या जवळ खोदकाम करणे, त्यांचे विद्रुपीकरण करणे ही बाब बेकायदेशीर नाही का दीक्षाभूमी ही धम्मदीक्षेची भूमी म्हणून जगात ओळखली जाते. दीक्षाभूमीला राष्ट्रीय स्मारक म्हणून जपल्या गेले पाहिजे. कुठल्याही राष्ट्रीय स्मारकाच्या अवतीभवती खोदकाम करणे, त्याचे विद्रुपीकरण करणे हा गुन्हा आहे. दीक्षाभूमी ही बौध्द धर्मियांच्या अस्मितेशी जुळलेली आहे. दीक्षाभूमीला धोका पोहोचेल असे कुठलेही बांधकाम त्याच्या आसपास करण्यासाठी स्मारक समितीने का परवानगी दिली 2024 च्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी येणा-या अनुयायांची काय व्यवस्था करणार स्मारक समिती येणा-या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी शहरातून, गावखेड्यातून, इतर राज्यातून येणा-या अनुयायांसाठी दीक्षाभूमीवर फिरायला जागा असणार नाही. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढतच आहे.अनुयायांचा ओघ थांबवण्यासाठीच स्मारक समितीने बांधकाम सुरू केलं असण्याची दाट शक्यता आहे. दीक्षाभूमीवर अनुयायांची दरवर्षी वाढत चाललेली संख्या या इथल्या विरोधकांच्या पोटात गोळा आणतेय त्यामुळे त्यांनी स्मारक समितीला हाताशी धरून दीक्षाभूमीचे विद्रुपीकरण करून भविष्यात येथे अनुयायांनी येऊ नये असे षडयंत्र केल्याची दाट शंका बौध्द अनुयायांच्या मनात येत आहेत.
        यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने स्पष्टीकरण म्हणून . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९५६ सालच्या धम्मक्रांतीने आंबेडकरी समाज निर्माण झाला. ती भूमी दीक्षाभूमी बनली. या दीक्षाभूमीने सार्वजनिक कल्याणाचा महामार्ग दिला. दीक्षाभूमीने संविधानाच्या माध्यमातून माणसाला हिमालय बनवले. त्या दीक्षाभूमीतून आंबेडकरी विचारांचे संवर्धन करण्यासाठी विकासाचे धोरण राबविण्यात येत असून येथे मेट्रो कार्यालयाचे वाहनतळ बनणार नाही आणि राजकारणासाठी दीक्षाभूमीचा वापर होऊ देणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मेट्रो कार्यालयाचे वाहनतळ दीक्षाभूमीच्या स्तुपाच्या जवळ करण्यात येत असल्याने भविष्यात मेट्रो कार्यालय वाहनतळ म्हणून वापरण्यात येईल, असा संदेश फिरत होता. यामुळे आंबेडकरी उपासकांमध्ये असंतोष पसरला, सामाजिक संघटनांच्या बैठकी सुरू झाल्या होत्या. दरम्यान स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई आणि सदस्य विलास गजघाटे यांच्याशी संपर्क साधला असता, दीक्षाभूमीच्या या वाहनतळाचा वापर १४ एप्रिल, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ६ डिसेंबर आणि दीक्षाभूमीवर होणाऱ्या आंबेडकरी विचारांच्या कार्यक्रमासाठीच होईल. दीक्षाभूमीवर असलेल्या डॉ. आंबेडकर कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठीही वापर करायचा की, नाही यासंदर्भातील निर्णय देखील आंबेडकरी जनता घेईल, असेही डॉ. गवई म्हणाले. दीक्षाभूमीच्या सौंदर्याकरणातील धोरण राज्य सरकारने ३१ मार्च २०२३ रोजी २०० कोटी ३१ लाख रुपयाच्या दीक्षाभूमी विकास प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. विकास प्रकल्पामध्ये दीक्षाभूमीच्या चार प्रवेशद्वारांचे विस्तारीकरण, चार तोरणद्वारे नव्याने बांधणे, स्मारकाभोवती दगडी परिक्रमा व दगडी पदपथ तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय खुले सभागृह उभारण्यात येणार आहे. बोधीवृक्षाचे संवर्धन करण्यात येईल. २० मीटर लांबी व १६.५० मीटर रुंदीचे व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. दोन मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यात येतील. ११.२५ फुट उंचीचा अशोक स्तंभ उभारण्यात येणार आहे.



संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)