विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रात ‘बांबू ग्रोवर’अभ्यासक्रमास सुरुवात ('Bamboo Grower' course started at Science and Technology Resource Centre)

Vidyanshnewslive
By -
0
विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रात ‘बांबू ग्रोवर’अभ्यासक्रमास सुरुवात ('Bamboo Grower' course started at Science and Technology Resource Centre)


गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था, मुंबई मार्फत व आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रातंर्गत विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रामध्ये ‘बांबू ग्रोवर’ या अभ्यासक्रमाची सुरुवात आजपासून (दि. 15 जून) करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आमुदाला चंद्रमौली, एस.टी.आर.सी. चे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रमुख श्री. आशीस घराई तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. पहिल्या बॅचच्या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत 30 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भविष्यात कौशल्य आणि त्याचे महत्व याविषयी मार्गदर्शन करून अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन व संचालन विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रातील चमूने केले.  

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)