बल्लारपूर येथील गोल पूल रेल्वेच्या कार्यासाठी 3 दिवस वाहतूक बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाच आवाहन (Traffic stop for 3 days for Gol Bridge Railway work in Ballarpur, administration appeals to use alternative route)
बल्लारपूर :- शहरातील गोल पुल आता रहदारी साठी दोन दिवस बंद राहणार आहे. याच महिन्यात २ जुन रोजी एक दिवसा करीता रहदारी साठी बंद होते. तेच आता १९ जुन रात्री १०.३० वाजता पासून २१ जुन चे रात्री १२ वाजे पर्यंत बंद राहणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून गोल पुलाच्या रस्त्याचे काम म्हणजे केवळ दिखावा आहे. उन्हाळ्यात काम करण्याऐवजी पावसाळ्यात त्यांना जाग आली आहे. रेल्वे प्रशासनावर आता नगिरकांचे विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्यांनी नगर परिषद ला गोल पुलाच्या दुरुस्ती करीता सहकार्य करण्याचे विनंती केली. रेल्वे विभागाच्या नगर परिषदेला प्राप्त पत्रानुसार १९ जून २०२४ च्या रात्री १०.३० वाजेपासून ते २१ जून २०२४ ला रात्री १२.०० वाजेपर्यंत गोलपुलियाचे रस्ता व नाली बांधकामाच्या कामाकरिता शहरातील गोलपुलिया बंद राहील, नागरीकांनी रहदारीकरीता WCL चा पर्यायी मार्ग वापरावा. तरी नागरीकांनी याबाबत नोंद घेउन रेल्वे प्रशासन तसेच नगर पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद चे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या