चंद्रपूर :- संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केला आहे. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मुख्य शासकीय योग दिनाचा कार्यक्रम दि. 21 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभुत आहे. या कार्यक्रमामध्ये शाळा, महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांकडून तसेच जिल्हास्तर विविध योग समिती, एन. एस. एस., नेहरु युवा केंद्र इ. युवा संघटनामार्फत योगा संबंधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर योग दिन कार्यक्रमाकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व विविध कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी, तसेच पतंजली योग समिती, पतंजली योगपीठ संस्था, जिल्हा योग संघटनेचे पदाधिकारी आणि शहरातील नागरीक व खेळाडू उपस्थित राहणार आहे. तरी सर्व नागरीक, योगसाधक, जेष्ठ नागरीक यांनी दि. 21 जून 2024 रोजी सकाळी 6.30 वा. तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या