बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा-बल्हारशाह जंगल सफारी मध्ये दोन वाघाच्या झुंजीत एक अडीच वर्षीय नर वाघाचा मृत्यु (A two-and-a-half-year-old male tiger died in a fight between two tigers at Karwa-Balharshah Jungle Safari in Balharshah Forest Reserve.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा-बल्हारशाह जंगल सफारी मध्ये दोन वाघाच्या झुंजीत एक अडीच वर्षीय नर वाघाचा मृत्यु (A two-and-a-half-year-old male tiger died in a fight between two tigers at Karwa-Balharshah Jungle Safari in Balharshah Forest Reserve.)


बल्लारपूर :- बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा बल्हारशाह जंगल सफारी मध्ये दिनांक 13 मे 2024 ला बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी गस्त करीत असतांना सकाळी 9.30 वाजताचे सुमारास सफारी मधील कक्ष क्रं.510 नियतक्षेत्र किन्ही येथे दोन वाघाच्या झुंजीत एक अडीच वर्षीय नर वाघाचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. पुढील कार्यवाही करण्याकरीता मौका स्थळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी श्री. मुकेश भांदककर व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी श्री. बंडु धोत्रे यांना बोलावुन यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन वन्यप्राणी (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये प्राथमीक वनगुन्हा क्रमांक 08961/224013 दिनांक 13.05.2024 जारी करुन मृत वाघाचे शव ताब्यात घेण्यात आले व शव शवविच्छेदना करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले. मृत बछडयाचे शवाचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, TTC चंद्रपुर व डॉ. आनंद नेवारे, पशुवैद्यकीय अधिकारी, चंद्रपुर यांनी केले. सदर प्रकरणात पुढील तपासा करीता मृत वाघाचे सिलबंद नमुने घेण्यात आले असुन ते रासायनीक विश्लेषणाकरीता वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठविण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. सदर कार्यवाही पुर्ण करण्याकरीता क्षेत्र सहाय्यक श्री.व्हि.पी. रामटेके, श्री.बि.टी.पुरी, वनरक्षक कु.वैशाली जेणेकर, कु.माया पवार, श्री. रंजीत दुर्योधन, श्री. परमेश्वर आनकाडे, श्री.एस.एस. नैताम व श्री. मनोहर धाईत व रोजंदारी वनसंरक्षण मजुर यांनी सहकार्य केले. नरेश रा.भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)