वृत्तसेवा :- बिहारच्या बेतिया (Bettiah) रेल्वे स्टेशनवर ऑनलाइन QR कोडद्वारे भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारा डिजिटलभिकारी राजूचा स्टेशनवरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राजू आजारी होता. त्याच्यावर बेतियातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होता. यादरम्यान त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. राजू रेल्वे स्टेशनवर सर्वांशी अतिशय हसून खेळून बोलायचा. तो कोणालाही त्रास द्यायचा नाही. जे लोक राजूला अनेकदा आर्थिक मदत करायचे किंवा ओळखायचे, त्यांना राजूच्या अकाली निधनाने धक्का बसला आहे. राजू स्वतःला देशातील पहिला डिजिटल म्हणायचा. डिजिटल इंडियाचा एक भाग असल्याचा त्याला खुप अभिमान होता. बेतिया शहरातील लोकांमध्ये राजू खुप लोकप्रिय होता. त्याच्या गळ्यात नेहमी एक QR कोड लटकलेला असायचा. विशेष म्हणजे तो स्वतःजवळ एक टॅबही बाळगायचा. मानसिक अपंगत्वामुळे राजूला कोणीनी नोकरी दिली नाही, त्यामुळे राजूने भीक मागणे सुरू केले. भीक मागून तो आपला उदरनिर्वाह करू लागला. दरम्यान, राजूच्या मृत्यूनंतर त्याचे अखेरचे दर्शन घेण्यसाठी रुग्णालयात मोठी गर्दी झाली. डिजिटल भिकारी राजूची ओळख म्हणजे त्याच्या गळ्यातील QR कोड आणि हातातील टॅब. पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडियाच्या आवाहनानंतर राजूने ऑनलाइन भीक मागणे सुरू केले होते. बेतिया रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड परिसरात QR कोडद्वारे भीक मागणारा राजू लालू प्रसाद यादव यांचाही मोठा चाहता होता. राजू स्वतःला लालू यादव यांचा मुलगा म्हणायचा. विशेष म्हणजे लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना राजूला दिवसातून दोनवेळा रेल्वेच्या कॅन्टीनमधून जेवण मिळायचे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या