आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर , सामान्य रुग्णालय चंद्रपूर व नविकिरन व्यसनमुक्ती केंद्र पदमापुर च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन (On the occasion of International Anti-Tobacco Day, a program was organized by District Legal Services Authority Chandrapur, General Hospital Chandrapur and Navikiran Addiction Center Padmapur.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर , सामान्य रुग्णालय चंद्रपूर व नविकिरन व्यसनमुक्ती केंद्र पदमापुर च्या वतीने दी. 31 मे  24 ला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती भीष्म मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नविकिरान व्यसनमुक्ती केंद्र पद्मापुर येथे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिव्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मा. सुमित जोशी सर यांनी केले. तर अध्यक्षस्थानी व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक मा. दिगंबर जी गेडाम होते .तर प्रमुख अतिथी डॉ.श्वेता सावलीकर, अतुल शेंद्र सर, मित्रंजय निरंजने सर, ऍड महेंद्र असरेट धनंजय तावाडे ई उपस्थीत होते. कार्यक्रमाची सुरवात द्वीप प्रज्वलन करून झाली यानंतर सर्व वक्त्यांनी तंबाखू चे दुष्परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर मार्गदर्शन केले. मा.जोशी सर यांनी आजची दिवसाचे महत्व विषद करून विधी सेवा प्रधिरिकरण तर्फे देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी दुधारे यांनी तर यांनी संचालन समुपदेशक धनंजय तावाडे यांनी व आभार प्रदर्शन प्रकल्प निर्देशक सीमा मेश्राम यांनी मानले . कार्यक्रमाला व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व रुग्ण आणि स्टाप उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)