मित्रानेच केला मित्राचा घात, दारूच्या वादातुन एकाची हत्या (A friend killed a friend, one was killed due to a drunken argument)

Vidyanshnewslive
By -
0
मित्रानेच केला मित्राचा घात, दारूच्या वादातुन एकाची हत्या (A friend killed a friend, one was killed due to a drunken argument)
चंद्रपूर :- घुग्घुस शहरातील मध्यभागी असलेल्या छोटा तलाव परिसरातील देशी दारूच्या भट्टी समोर काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सूरज जयस्वाल (४०) असे मृतकाचे नाव आहे. सूरज जयस्वाल व संतोष कुंदावार हे दोघे मित्र दारू पिण्याकरिता गेले असता पैश्याचा वादात संतोष यांनी सूरज याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केले. यात सूरज हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला तपासून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घुग्घुस पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करीता चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयत पाठविले. या संदर्भात पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)