मतदार यादीतील घोळ संपता संपेना, एकाच मतदाराची चक्क 6 वेळा मतदार यादीत नाव (The confusion in the voter list does not end, the name of a single voter appears in the voter list almost 6 times)

Vidyanshnewslive
By -
0
मतदार यादीतील घोळ संपता संपेना, एकाच मतदाराची चक्क 6 वेळा मतदार यादीत नाव (The confusion in the voter list does not end, the name of a single voter appears in the voter list almost 6 times)


मुंबई :- लोकसभा निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष ठिकठिकाणी प्रचारासाठी जात आहेत. याचसंदर्भात बोगस मतदार याद्या, बिघाड झालेली मतदानाच्या मशीन असे अनेक प्रकार काही नवीन नाही. जिथे मतदाराला यादीत नाव शोधताना दमछाक होतेय अनेक जिवंत असलेल्या व वर्षानुवर्षं मतदानाचा हक्क बजावलेल्या मतदाराची मतदान यादीतून नावे गायब झाली तिथेच एकाच मतदाराची चक्क 6 वेळा मतदार यादीत नाव असल्याचा घोटाळा उघडकीस आला नालासोपारा मतदार संघातील (Loksabha Constituency) असाच एक घोटाळा समोर आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नालासोपारा मतदार संघातील याद्यांमध्ये झालेला घोळ अद्यापही निस्तरण्यात आला नाही. एकाच मतदारांची नावे एकाच पानावर सहावेळा असल्याचे निदर्शनास आले आहे. 132 नालासोपारा मतदार संघातील याद्यांमधील एकाच पानावर सुषमा गुप्ता या महिला मतदाराचे नाव सहा वेळा असल्याचे दिसून आले आहे. हे नाव यादी क्र.२ मध्ये 23 जानेवारी ते २ मे दरम्यान समाविष्ट करण्यात आले आहे. सुषमा गुप्ता हे नाव अनुक्रमांक 1316,1319,1320,1321,1322,1334 यावर समाविष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनुक्रमांक वेगवेगळे असले तरी सुषमा गुप्ता यांचा फोटो आणि पत्ता एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकी मोठी चुक निवडणूक अधिकाऱ्यांना दिसली नाही की त्यांनी ती जाणीवपुर्वक दुर्लक्ष केली असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हजारो बोगस मतदारांची नावे टाकण्यात आल्याच्या तक्रारी होत्या. मुंबई, ठाणे, उत्तर प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची नावांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. त्यांच्या नावापुढे टाकलेले पत्ते अत्यंत चुकीचे होते. तसेच त्यांच्या नावाची ओळखपत्रेही तयार करण्यात आली होती. बोगस मतदान करण्याच्या हेतूने हा प्रकार करण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे यंदाही मतदार यादीत घोळ कायम असल्याचे दिसून आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)