धक्कादायक ! नागपुरात बनावट कागदपत्राच्या आधारावर आरटीई मध्ये प्रवेश, 17 पालकांवर गुन्हे दाखल (Shocking! Admission in RTE on the basis of fake document in Nagpur, case filed against 17 parents in Nagpur)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! नागपुरात बनावट कागदपत्राच्या आधारावर आरटीई मध्ये प्रवेश, 17 पालकांवर गुन्हे दाखल (Shocking! Admission in RTE on the basis of fake document in Nagpur, case filed against 17 parents in Nagpur)


नागपूर :- नागपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या आरटीई प्रवेशासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरटीई अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना कमी शुल्कात प्रवेश दिला जातो. याचाच गैरफायदा नागपूरमध्ये तब्बल १७ पालकांनी घेतल्याचं समोर आलं आहे. बनावट कागदपत्रे सादर करून आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविणाऱ्या १७ पालकांवर नागपूरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. एकूण १७ पालकांनी असा गैरप्रकार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संबंधित पालकांवर नागपूरमधील सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजेच आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यंदा हा अर्ज करण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. अर्ज करताना पालकांनी अर्जासोबत घराचा पत्ता, जन्मदाखला आणि जात प्रमाणपत्र जोडावे लागते. अर्जामध्ये काहीही चुकीची माहिती आढळल्यास विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करता येतो. https://student.maharashtra.gov.in/adm_portal या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज करता येतो. काही पालकांनी आपल्या मुलांना आरटीई योजनेचा लाभ मिळावा, पैसे वाचावेत या हेतुने योजनेसाठी लागणारे बनावट कागदपत्रे तयाक केले. यातील अनेक पालकांनी खोटे उत्पन्न दाखवले तर काहींनी चुकीची रेंट ऍग्रिमेंट जोडल्याचं तपासात उघड झालं आहे. आता या १७ पालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. त्यांची सविस्तर चौकशी केली जात आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)