डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रयत्न केले - डॉ. बी. डी. चव्हाण (A 3-day lecture series was organized in Mahatma Phule College
Dr. Babasaheb Ambedkar tried for national unity - Dr. B. D. Chavan)
बल्लारपूर -: महाराष्ट्र शासन व गोंडवाना विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक महाविद्यालतातील विद्यार्थी व शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने 12 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत व्याख्यान व विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचनेच्या अनुषंगाने बल्लारपूर येथील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रित्यर्थ पहिल्या दिनी 12 एप्रिल रोजी महात्मा फुले महाविद्यालयातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात ' घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ' या विषयावर डॉ. प्रमोद शंभरकर (राज्यशास्त्र विभाग) सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान पार पडले
तर दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल रोजी डॉ. मृदुला जांगळेकर (मराठी विभाग), डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर यांनी 'राष्ट्रप्रेमी डॉ. आंबेडकर' या विषयावर विचार पुष्प पार पडले तर 14 एप्रिल रोजी या व्याख्यान मालेचा समोरोपीय कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रकाश मेश्राम यांची विचार पिठावर उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारत देशाविषयी अभिमान होता. भारत शब्दाबद्दल त्यांना विशेष आकर्षण होते. त्यांच्या ग्रंथरचनेत, पत्रकारितेत आणि भाषणात भारत देशाची भौगोलिक अखंडता आणि राष्ट्रीय एकता व अस्मिता भंग पावेल असे कोणतेही वाक्य व वक्तव्य दिसून येत नाही कारण राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम हे त्यांच्या जीवन कार्याचे अतूट अंग होते. स्वतंत्र भारत हे मजबूत, सबळ आणि प्रगत झाले पाहिजे असे त्यांचे स्वप्न होते . त्यांनी देशाची ऐकता आणि एकात्मतेसाठी सतत प्रयत्न केले असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण यांनी केले. पुढे ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना संविधानिक हमी मिळवून दिली आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या तरतूदी केल्या हे कोणीही नाकारू शकत नाही.
बाबासाहेबांनी कर्मचाऱ्यांना संवैधानिक हमी देणे हे त्याचे एक राष्ट्रीय कार्य होय. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या गोलमेज परिषदेत राजकीय स्वातंत्र्याठी आवाज उठविला. इंग्रजांनी भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करावे ही त्यांची मागणी राष्ट्राच्या अभिमानापोटी होती. त्यांनी तयार केलेले हिंदू कोड बिल हे स्त्रियांच्या उद्धाराच्या दृष्टीने टाकलेले एक महत्वाचे राष्ट्रीय पाऊल होते. या निमित्ताने महाविद्यालयात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व गीत गायन स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या व्याख्यान मालेच्या निमित्ताने डॉ. पंकज कावरे (ग्रंथालय विभागाच्या) वतीने ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ रोशन फुलकर यांनी तर आभार प्रा. डॉ. पल्लवी जुनघरे यांनी मानले. विशेष म्हणजे यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी गीत गायनाच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या