राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका आणखी पुन्हा लांबणीवर, तीन आठवड्यानंतरची सुनावणीची तारीख (Municipal elections in the state further postponed, hearing date after three weeks)

Vidyanshnewslive
By -
0

राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका आणखी पुन्हा लांबणीवर, तीन आठवड्यानंतरची सुनावणीची तारीख (Municipal elections in the state further postponed, hearing date after three weeks)

नवी दिल्ली :- राज्यातील महापालिका निवडणुकांचा फैसला पुन्हा तीन आठवड्यांसाठी आणखी लांबणीवर पडला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. राज्यातील 23 महापालिकांच्या निवडणुका दीर्घकाळ लांबणीवर पडलेल्या आहेत. या महापालिकांमध्ये सध्या प्रशासकराज आहे. प्रामुख्याने महापालिकांची प्रभाग रचनाबाबत सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल झालेल्या असून, त्यावरील सुनावणीत राज्य सरकारने बाजू मांडण्यासाठी सातत्याने मुदतवाढ घेतली आहे. त्यामुळे हा निर्णय लांबणीवर पडत आहे. सोमवारी यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. मात्र, यात सरकारी वकील आजारी असल्याने सरकारने पुन्हा मुदतवाढ मागवून घेतली. त्यामुळे ही सुनावणी पुन्हा तीन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. परिणामी, आता येत्या उन्हाळ्यात पालिका निवडणुका होणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे 9 मेपासून सर्वोच्च न्यायालयाला सुटी असणार आहे. त्यापूर्वी जरी महापालिका निवडणुकांचा फैसला झाला, तरी पावसाळ्याचा कालावधी या निवडणुकीच्या प्रभाग रचनेपासून मतदारयादीपर्यंतच्या तयारीत जाणार आहे. त्यामुळे निवडणुका थेट ऑक्टोबरमध्ये किंवा दिवाळी नंतर होतील, असे अंदाज चंद्रकांत पाटील यांनी केले आहे

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)