बल्लारपुरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी, डॉ. आंबेडकरांच्या तैलचित्राचं संस्थाध्यक्ष मा.संजयभाऊ कायरकर यांच्या हस्ते अनावरण (Mahatma Jyotiba Phule College in Ballarpur. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Celebration, Unveiling of Dr. Ambedkar's Oil Painting by Mr. Sanjay Bhau Kairkar, President of the Institute)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 सावी जयंती साजरी करण्यात आली राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या संयुक्त माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होत या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर सर, मा. प्रा.डॉ. बादलशाह चव्हाण, प्रभारी प्राचार्य, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर, मा. प्रा.डॉ.किशोर चौरे सर, इतिहास विभाग प्रमुख, ई ची उपस्थिती होती सर्वप्रथम अतिथींनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून बाबासाहेबांना अभिवादन केले तदनंतर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राचं अनावरण संस्थाध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर व प्रभारी प्राचार्य मा. प्रा.डॉ. चव्हाण सर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मा. किशोर चौरे सर म्हणालेत की, बाबासाहेब प्रज्ञासूर्य होते सद्यस्थितीत व्यक्ती हा आपल्या वास्तव्यासाठी घर बांधतोय पण महामानव जगातील पहिले असे व्यक्ती होते ज्यांनी केवळ आपल्या ग्रंथसंपदेसाठी मुंबई येथे " राजगृह" नावाचे प्रशस्त असे घर बांधले, बाबासाहेबांना तत्कालीन परिस्थितीत अनेक हाल-अपेष्ठा सहन कराव्या लागल्यात इतकंच नव्हे तर भारताचे संविधान लिहताना समितीतील ईतर सदस्यांच्या अनुपस्थितीमुळं बाबासाहेबांनी 2 वर्षे 11 महीने, 17 दिवसाच्या अथक प्रयत्नातून घटना तयार केली ज्यामुळं आज देशातील प्रत्येक व्यक्ती मग तो शेतकरी, कामगार, महिला प्रत्येकाना अधिकार बहाल केले. यानंतर संस्थाध्यक्ष मा. संजय भाऊ कायरकर मार्गदर्शन करतांना म्हणालेत की, बाबासाहेबांचा जयजयकार करण्यापेक्षा त्यांचे विचार प्रत्यक्षात कृतीत उतरविणे महत्वाचे असून समता, न्याय व बंधुता प्रस्थापित करण्याचं प्रयत्न केला गेला पाहिजे विशेष म्हणजे 14 एप्रिल "विद्यार्थी दिन" निमित्तानं महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला सुजाण नागरिक बनविण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.
यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण, आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणालेत की, बाबासाहेब हे केवळ व्यक्ती नसून एक विचार आहे व्यक्तीचा अंत होत असतो मात्र विचार कधीही मोडकळीस येत नाही बाबासाहेबांचे विचार भूतकाळातच नव्हे तर वर्तमानासोबत भविष्याचाही वेध घेणारे आहेत. बाबासाहेबांनी केवळ एका जातीचा विचार केला नाही तर संपूर्ण समाजाचा विचार केला त्यामुळं या देशातील सर्व आदिवासीसह ओबीसी व दलितांना सन्मानानं जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्राप्त करून दिला. या कार्यक्रमाचं संचालन प्रा.डॉ. रोशन फुलकर सर व आभार प्रदर्शन प्रा.मोहितकर सर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.
Post a Comment
0Comments