बल्लारपुरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती साजरी (Mahatma Jyotiba Phule College, Ballarpur celebrated Krantisurya Mahatma Phule Jayanti)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती साजरी (Mahatma Jyotiba Phule College, Ballarpur celebrated Krantisurya Mahatma Phule Jayanti)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यानिमित्तानं विचार पिठावर असलेल्या मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करतांना आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक अश्या अनेक प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे, तसेच तरुणांना ध्येय पूर्ण करण्याकरिता महात्मा फुले यांचे जीवनकार्य प्रेरणा देणारे आहे, देशातील सर्व समाजातील स्त्रियांना मानाने व सन्मानाने जगण्याचे सामर्थ्य निर्माण करणारे निर्माता महात्मा ज्योतिबा फुले होय असे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनातून प्रा. किरण डांगे यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य अनन्य साधारण नव्हते, विद्यार्थ्यानी महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड अश्याप्रकारच्या ग्रंथाचे वाचन केले पाहिजे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. किशोर चौरे यांनी या प्रसंगी केले. स्त्रियांनाही समाजात स्थान निर्माण करण्याच बळ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यातून दिसून येते, समग्र स्त्री उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले आहे असे मत प्रा. डॉ. रोशन फुलकर यांनी आपल्या प्रस्ताविकेतून मांडले. स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना NSS विभागाच्या वतीने ‘राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात प्रा. डॉ. विनय कवाडे, प्रा. सतीश कर्नासे, प्रा.स्वप्नील बोबडे , प्रा. रोशन साखरकर,प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. पल्लवी बोरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा.मोहनिश माकोडे, प्रा. दिपक भगत, प्रा. डॉ. पंकज कावरे, प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. शुभांगी भेंडे शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कुमारी स्नेहा गौर यांनी केले तर आभार कु. सानिया शेख यांनी मानले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)