रेल्वे प्रवास दरम्यान मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक, २७ मोबाईल हस्तगत, एलसीबी लोहमार्ग नागपूर ची कामगिरी (Inveterate criminals who stole mobile phones during train journey arrested, 27 mobile phones seized, performance of LCB Lohmarg Nagpur)

Vidyanshnewslive
By -
0

रेल्वे प्रवास दरम्यान मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक, २७ मोबाईल हस्तगत, एलसीबी लोहमार्ग नागपूर ची कामगिरी (Inveterate criminals who stole mobile phones during train journey arrested, 27 mobile phones seized, performance of LCB Lohmarg Nagpur)

बल्लारपूर :- रेल्वे प्रवासी गाड्यावर मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना २७ मोबाईलसह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर पोलिसांना यश आले. रेल्वे स्थानक बल्लारशाह चंद्रपूर दरम्यान रेल्वे प्रवासी गाड्यावर व परिसरात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी कारवाही करणेबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर येथील पथक रेल्वे स्थानक बल्लारशाह येथे १ एप्रिल ला आले असता त्यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर काझीपेठ एंड कडील सिग्नल आउटर वरून चार चोरांना मोठ्या शिताफीने पकडुन विचारपूस केली असता त्यांनी रेल्वे प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांचे मोबाईल चोरून नेल्याचे सांगितले. त्यांचे कडून २७ विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल एकूण किंमत ३,५६,००० रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असून आरोपी नामे शेख इक्रिमा शेख फिरोज वय १९ वर्ष रा. साईबाबा वार्ड बल्लारपूर, जि. चंद्रपूर, करण तुळशीदास जीवने वय २१ वर्ष रा. सातनल चौक, आंबेडकर वार्ड बल्लारपूर जि. चंद्रपूर, अमन मखदून शेख वय २१ वर्ष रा. राणी लक्ष्मीबाई वार्ड बल्लारपूर जि. चंद्रपूर, पंकज हिरालाल विनक वय २१ वर्ष रा. गौरक्षण वार्ड बल्लारपूर जि. चंद्रपूर यांना अटक करण्यात आले आहे. पुढील कार्यवाहीकामी करीता आरोपी व जप्त मुद्देमालासह रे. पो. स्टेशन वर्धा यांचे ताब्यात दिले. सदरची कारवाही श्रीमती वैशाली शिंदे पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर व अनंत तारगे उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग अकोला यांच्या मार्गदर्शनात विकास कानपेल्लीवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर यांचे सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस उपनिरीक्षक प्रविण भिमटे, पोलीस नायक विनोद खोब्रागडे, नितीन शेंडे, पोलीस शिपाई रोशन अली तसेच रे. पो. चौकी बल्लारशाह चे शिपाई पंकज बांते, संदेश लोणारे व निलेश निकोडे यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)