विहिरी मंजूर करून घेण्यासाठी बीडीओ नी मागितली लाच, मात्र गावच्या सरपंचानी लाच न देता पंचायत समितीवर पैसे उधळून केले अनोखे आंदोलन, प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधिता विरुध्द केली कारवाई (BDO asked for bribe to approve the well, but the Sarpanch of the village squandered money on the Panchayat Samiti without paying the bribe. The administration took serious notice and took action against the concerned.)
छत्रपती संभाजी नगर :- राजकारण सध्या बदलत आहे. भ्रष्ट व्यवस्थेला सामोरं जाण्याची पद्धतही बदलते आहे. एक युवा सरपंचाची कृत्याची सध्या राज्यभर चर्चा होतेय. गेवराईमधल्या पायगा गावातील एका अधिकाऱ्याने सरपंचाला लाच मागितली म्हणून आक्रमक होत आंदोलन केलं. गेवराई पायगा इथल्या सरपंचाने लाच देण्यासाठी आणलेले 2 लाख रुपये चक्क उधळून आंदोलन केलं. फुलंब्री पंचायत समितीसमोर या तरूण सरपंचाने पैसे उधळत आंदोलन केलं. तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत आंदोलन करण्यात आलं. विहिरीसाठी अधिकारी 12% पैसे मागत असल्यामुळे नोटा उधळत आंदोलन केल्याचं या सरपंचाने सांगितलं. मंगेश साबळे असं नोटा उधळून आंदोलन करणाऱ्या सरपंचाचं नाव आहे. “विहीरीला मंजूरी द्यायची असेल तर 12% द्यावेच लागतील. गरीब असो की श्रीमंत आम्ही ही टक्केवारी घेतोच, अशी मागणी अधिकाऱ्याने केली. त्यानंतर मला या सगळ्या व्यवस्थेचा राग आला.त्यामुळे मी आंदोलन केलं”, असं मंगेश साबळे या सरपंचाने सांगितलं. या सर्व आंदोलनाची राज्य सरकारने वेळीच गंभीर दखल घेतली असून फुलंब्री पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना निलंबित करण्यात आले असून आणखी काही व्यक्ती विरुध्द चौकशी समिती गठीत करण्यात आली असल्याची माहीती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments