बल्लारपुरात प्रियदर्शी सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन (In Ballarpur Priyadarshi Emperor Ashok, Chhatrapati Shivaji Maharaj, Krantiba Jyotiba Phule, Organizing a 2 day program on the occasion of joint birth anniversary of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक जयभीम चौक परिसरात चक्रवती सम्राट अशोक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीबा ज्योतिबा फुले, लाखो दलित शोषित पीडित वंचितांचे कैवारी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं जयंती उत्सव समिती, विद्यानगर वार्ड बल्लारपूर च्या वतीने 8 व 9 एप्रिल 2023 ला प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यात 8 एप्रिल ला दुपारी 2:00 वाजता 'मेंदूच व्यवस्थापन हेच जीवनाचं व्यवस्थापन' या विषयावर डॉ. जगदीश राठोड, पुणे हे मार्गदर्शन करतील सोबतच 9 एप्रिलला दुपारी 2:00 वाजता त्यांच्या संमोहनाचा स्टेज शो आयोजित केला आहे. याशिवाय सायंकाळी 4:30 वाजता दिशा पिंकी शेख, मुंबई यांचं " स्त्री-पुरुष समानता" या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तदनंतर कु. तुलसीताई हिवरे, नागपूर यांचा सप्तखंजेरी वादन सोबत प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रबोधनाची चळवळ जी शाहिरांनी पुढे नेली त्यातील परंपरा पुढे चालविणारे शाहीर संभाजी भगत, मुंबई यांचा 9 एप्रिलला सायंकाळी 6:00 वाजता प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोबत शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्व महापुरुषाच्या जीवनावर आधारित स्पर्धा परिक्षा व गीत गायनाच्या कार्यक्रमाचं ही आयोजन करण्यात आलं असून या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं सहभागी होऊन आस्वाद घेण्याचं आवाहन जयंती उत्सव समिती, बल्लारपूरच्या वतीने प्रशांत झामरे, लक्ष्मण गोडघाटे, सुमित आमटे, देशपाल सौदागर, प्रविण थूल, सचिन मेश्राम, यांच्या सह महिला कार्यकर्त्यांनी केल आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments