वर्धा जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम 16 प्रकारच्या शासकीय सेवा मिळणार घरपोच, ' सेवादूत ' राज्यातील पहिलाच उपक्रम वर्धेत (Wardha district administration's innovative initiative 16 types of government services will be provided at home, 'Sevadoot' is the first initiative in the state in Wardha)
प्रायोगिक तत्वावर सुरुवातीस वर्धा शहरात हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात वय व राष्ट्रीय अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, तात्पुरते निवासी प्रमाणपत्र, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, पत दाखला, सांस्कृतिक कार्यक्रम परवानगी, साक्षांकित प्रत, नॉन क्रिमिलेयर, भूमिहीन प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, सर्वसाधारण ॲफिडेव्हीट, लघु शेतकरी प्रमाणपत्र, झाडे तोडण्याची परवानगी अशा प्रमाणपत्रांचा समावेश आहे. राज्यात पहिल्यांदाच हा उपक्रम राबवतो आहे. सर्वसाधारण कामांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात जावे लागू नये, त्यांना सहज आणि कालमर्यादेत घरीच सेवा मिळावी, हा या मागील उद्देश आहे. यासाठी आपण स्वतंत्र अँप देखील विकसित केले आहे. यावर प्राथमिक स्वरुपाची माहिती भरुन सेवादूताची अपाँईनमेंट घेतल्यानंतर घरपोच सेवा उपलब्ध होऊ शकेल. प्रायोगिक तत्वावर वर्धा शहरात व पुढे जिल्हाभर हा उपक्रम राबविला जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. प्रकल्पाच्या 'सेवादूत' नावाने तयार करण्यात आलेल्या ‘ॲप’द्वारे लाभार्थ्यांने फक्त नाव, पत्ता, संपर्क क्रमांक ही प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिल्यानंतर 'सेवादुत' हे वेळ घेऊन लाभार्थ्यांच्या घरी येतील. त्यांना पाहिजे असलेल्या सेवांचे कागदपत्र सेवादुत घरीच स्कॅन करून घेतील. त्यानंतर ऑनलाईन अर्ज दाखल केल्या जाईल. लाभार्थ्याचा दाखला किंवा प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर लाभार्थ्याला घरपोच नेऊन देतील. ही सर्व सुविधा लाभार्थ्याला घरीच उपलब्ध होणार असल्याने यासाठी घराबाहेर कोणत्याही कार्यालयात जावे लागणार नाही.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments