RTE ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज पासून सुरु होणार (Online admission process of RTE will start from today)
वृत्तसेवा :- मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार RTE ची 25% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकासाठी ची प्रवेश प्रक्रिया आज 1 मार्च 2023 ला दुपारी 3:00 वाजता पासून सुरु होत आहे. ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 17 मार्च ला रात्री 12:00 वाजेपर्यंत सुरु असणार आहे. दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खाजगी विनाअनुदानित, खाजगी कायम विनाअनुदानित शाळांत पुर्व प्राथमिक वर्ग व इयत्ता पहिली साठी पालकांनी RTE च्या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करायचा अर्ज करतांना पालकांनी माहीती खरी व अचूक भरावी एका पेक्षा अधिक अर्ज भरू नये पालकांनी शाळांची निवड करतांना 10 शाळांची काळजी पूर्वक निवड करावी. तसेच पालकांनी आवश्यक कागदपत्र म्हणुन निवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, बालकाचे व आधार कार्ड किंवा आधार पावती, उत्पन्नाचा दाखला, अनाथ बालक, एच.आय.व्ही बाधित बालक, कोविड प्रभावित बालक ई कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे.
संपादक - दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments