नगर पालिकेच्या शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल. उपविभागीय अधिकाऱ्याच्या समक्ष 10 मार्च ला शांळाची तपासनी करणार.

Vidyanshnewslive
By -
0

नगर पालिकेच्या शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल. उपविभागीय अधिकाऱ्याच्या समक्ष 10 मार्च ला शांळाची तपासनी करणार. (The District Collector took notice of the problems of the students in the municipal government school.  Shalan will be examined on March 10 before the Sub-Divisional Officer.)

बल्लारपूर :- बल्लारपुर शहरत सध्या नगरपालिका प्रशासनाने जिथे नको तिथे नागरिकांच्या विकास निधीचा गैरवापर करने सुरु केले आहे, नागरिकांच्या मुलभुत सुविधाना बाजूला सारुण नगरोंत्थानाच्या नावावर निलैंखित वास्तु नसताना पुनर्बांधकामासाठी कोट्यवधी रुपयाचा निधि खर्चून मुलभुत गरजांना पायदळी तुडवीत असताना येथील नागरिकांप्रति कर्तव्यदक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने पालिका पुनरबांधनिच्या बांधकामावर आक्षेप घेत पालिका शाळातील विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलभुत शाळेचे नियोजन करून विद्यार्थीकरिता बनलेली नवनिर्मित शाळेत पालिकेचे हस्तातरण नको? या प्रमुख विषयाला घेऊन धरणे आंदोलन करीत आवाज बुलंद करता प्रशासन जागे झाले, आंदोलनाची दखल जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शाळा निरिक्षण करण्यास थेट उपविभागीय अधिकारी यांच्या प्रमुखतेखाली समिति नेमण्यात आली, दिनांक 10 मार्च 2023 रोजी पालिकेच्या सर्वांगीण सोई सुविधा युक्त शाळेचे निरिक्षण होणार असून, योग्य ठिकाणी  पालिकेचे त्यानुसार स्थानांतरण होणार असल्याचे आजच्या बैठकीत स्पष्ट झाले आहे, बैठकीत अनुक्रमे उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, मा. दीप्ती सूर्यवंशी पाटिल मॅडम,  तहसीलदार बल्लारपूर मा. स्नेहल रहाटे मॅडम, उपमुख्यधिकारी मा. जयवंत काटकर, शिक्षण अधिकारी श्रीनिवास रायला, मुख्यध्यापिका परचाके मॅडम (गाँधी विद्यालय) तसेच इतर शिक्षक वृन्द व आम आदमी पार्टी बल्लारपुर चे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, जिल्हा संघठक भिवराज सोनी आणि प्रा. नागेश्वर गंडलेवार, शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, सचिव ज्योतिताई बाबरे, कोषाध्यक्ष आसिफ हुसैन शेख, यूथ अध्यक्ष सागर कांमळे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, यूथ संघठक अलीना शेख, CYSS सहप्रमुख आशीष गेड़ाम, सुधाकर गेड़ाम  व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


संपादक - दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)