बल्लारपूर-कोठारींच्या जंगलात आढळलय दुर्मिळ असलेलं पांढर हरीण, बल्लारपुरातील सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांनी केला दावा ! वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी दुजोरा दिल्याची सूत्रांची माहीती (A rare white deer found in the forest of Ballarpur - Kothari, claimed by social worker Pawan Bhagat in Ballarpur! Sources informed that Forest Minister Sudhir Mungantiwar has confirmed this)
बल्लारपूर :- विपुल खनिज संपत्ती आणि घनदाट जंगलाची देणं लाभलेल्या चंद्रपूर जिल्हा वन्य-जीव व जैवविविधतेसाठी जगप्रसिद्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तसेच इतरही परीसरात अनेक दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास पहायला मिळतो. अलिकडेच ताडोबातील पर्यटकांना काळ्या बिबट्याच्या दर्शनाने कुतुहल निर्माण झाले होते. परंतू जिल्ह्यात सद्या चर्चा रंगली आहे ती पांढर्या रंगाच्या हरीणीची... आपण सर्वांनी हरीण पाहिलायं पण चंद्रपूर जिल्ह्यात पांढरा हरीण आहे असे म्हटल्यास अनेकांना आश्चर्याचा धक्काचं बसेल. परंतु होय हे खरे आहे. जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात येणार्या कोठारी (Kothari) येथील जंगलात फिरायला गेलेल्या पवन भगत यांना दुर्मिळ प्रजातीची ही पांढरी हरीण (White Albino Hog Deer) दिसल्याचा दावा त्यांनी समाजमाध्यामांवर केला आहे. यासंदर्भात वनविभागाकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नसला तरी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समाजमाध्यामावर यासंदर्भात पोस्ट केल्याने वन्यजीव अभ्यासकांसह हौशी पर्यटकांमध्ये या पांढऱ्या हरीणाला बघण्यासाठी उत्साह वाढला आहे. याआधी ईशान्य भारतातील आसाम राज्यात असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्याणात (Kaziranga National Park Assam) असे दुर्मिळ पांढरे हरीण आढळून आले आहे. या हरीणाचा पांढरा रंग पूर्णपणे आनुवंशिक असल्याचा काही तज्ञांचे म्हणणं आहे. तर जीन्स'मधील बदलामुळे हा प्रकार घडतो. या हरीणाची वेगळी जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. अभ्यासकांचे मते, १००० हरीणींच्या मागे एखादं हरीणीत ची लक्षणे दिसू शकतात. या हरीणीची संख्या स्वीडनमधील वेस्ट वर्मलँडमध्ये ५० च्या जवळपास आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments