भाजपचे आमदार बंटी भांगडिया व त्यांच्या कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल (A case of molestation has been registered against BJP MLA Bunty Bhangdia and her activist)

Vidyanshnewslive
By -
0

भाजपचे आमदार बंटी भांगडिया व त्यांच्या कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल (A case of molestation has been registered against BJP MLA Bunty Bhangdia and her activist)

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानभा मतदारसंघातील भाजप आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुर पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचे भाजप (BJP) आमदार बंटी भांगडिया आणि त्यांच्या 8 कार्यकर्त्यांवर मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे. तर आमदार भांगडिया यांच्या तक्रारीवरून फिर्यादी साईनाथ बुटके यांच्यावरही शिवीगाळ आणि बदनामी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकारामुळे भाजप आणि काँग्रेस अशा दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे महिलेने भांगडीया यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, साईनाथ यांचा मोठा भाऊ गजानन बुटके हे काँग्रेस पक्ष चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. ११ तारखेच्या दिवशी सायंकाळी सात-साडेसातच्या सुमारास भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन बुटके यांच्या घराबाहेर आले. यानंतर बुटके यांना शिवीगाळ केली. तसेच घरात जबरदस्तीने शिरले व साईनाथ यांना मारहाण केली. मारहाण करतच त्यांना घराबाहेर ओढून आणले. या मारहाणीला विरोध करताना विनयभंग केला गेला, असा आरोपपिडीत महिलेने केला आहे. पिडितेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यासह, त्यांच्या १५ ते २० कार्यकर्त्यांविरूद्ध कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)