समता सैनिक दल 96 व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपुरात एक दिवसीय विशेष शिबिर संपन्न.. (On the occasion of 96th anniversary of Samata Sainik Dal, a one-day special camp was held in Chandrapur.)
चंद्रपूर :- भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद.भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये समता सैनिक दलाचे 96 वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तथा संपूर्ण भारतामध्ये समता सैनिक दलाचे एक दिवसीय विशेष शिबिर घेण्याचे आदेश प्राप्त झाले होते. यानुसार काल दिनांक 12 मार्च 2023 ला भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल चंद्रपूर जिल्हा पश्चिम विभागाच्या वतीने चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर एक दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी 11.0 वाजता समता सैनिक दल च्या ध्वजारोहन जिल्हाध्यक्ष इंजी. नेताजी भरणे यानी केले तसेच भ.बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांचे प्रतिमेसमोर मोमबत्ती प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन केले. यानंतर त्रिशरण पंचशील घेऊन शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिरा विशेष अतिथि एड जगदीप खोब्रागडे जिल्हा सरचिटणीस, शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक तथा या शिबिराचे अध्यक्ष आद प्रफुल भगत मेजर, आद गुरु बालक मेश्राम मेजर, आद अशोक पेरकावर लेफ्टनंट कर्नल यानी आज दिवसभर सैनिकाची परेड घेतली तथा विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या विशेष शिबिरात प्रमुख उपस्थिति आद संदीप सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष तथा युनिट लीडर, आद संकेत जयकर युनिट P, आद जगदीप आघात जिल्हा सचिव, आद श्रवण जीवने सर अध्यक्ष कोरपणा तालुका आद पारेकर सर कोरपना, आद आनंदराव जांभुळकर सरचिटणीस वरोरा, आयु.नि. मेघाताई बोरकर अध्यक्ष राजुरा शहर, आद गौतम चौरे सरचिटणीस राजुरा तालुका, आद देवगड़े साहेब राजुरा, आयु. नि. सुनीता काम्बले अध्यक्ष भिवापुर वार्ड वार्ड शाखा. तसेच चन्द्रपुर जिल्ह्यातून वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरफना या तालुक्यातून सैनिकांनी सहभाग घेतला होता. आजच्या शिबिर खूप मोठ्या उत्साहात संपन्न झाले आणि यशस्वी झाले याकरता समता सैनिक दल च्या विभाग नी खूप मेहनत घेतली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments