ब्रेकिंग न्यूज ! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयानी याबाबतचे आदेश दिल्याची माहीती (Breaking news ! Rahul Gandhi's MP's candidacy is cancelled, Lok Sabha Secretariat has given an order in this regard)
वृत्तसेवा :- राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला असल्याची माहीती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियान (पीटीआयनं) याबाबतचं वृत्त दिलं आहे यासंदर्भातील अधिक माहितीनुसार सुरत येथील न्यायालयानं एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर व या प्रकरणात 2 वर्षाची शिक्षा सुनावल्या नंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याची माहीती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याचं संसद सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments