काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बल्लारपुरात निषेधार्थ सभा (Ballarpur City Congress Committee held a protest meeting in Ballarpur against the cancellation of Congress leader Rahul Gandhi's candidacy)

Vidyanshnewslive
By -
0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बल्लारपुरात निषेधार्थ सभा (Ballarpur City Congress Committee held a protest meeting in Ballarpur against the cancellation of Congress leader Rahul Gandhi's candidacy)

बल्लारपूर :- 2019 मध्ये सुरत येथील एका न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याच्या निकाल जाहीर करतांना न्यायालयानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली या निर्णयाचा आधार घेत लोकसभा सचिवालयान अवघ्या 24 तासात सन्माननीय राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली हे सर्व राजकीय दबावातून केला असल्याचा आरोप करून आज दि. 25/03/2023 ला आमचे लाडके नेते मा. राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द करण्यात आल्या बद्दल व भारतीय जनता पक्षाच्या दडपशाही व हिटलरशाही विरुद्ध शहर काँग्रेस कमिटी बल्लारपूर ने नगर परिषद चौक मध्ये निषेधार्थ सभा घेण्यात आली .मा. घनश्याम मूलचंदानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सदस्य, शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष करीम भाई , देवेंद्र आर्य, ऍड मेघा भाले, यांनी आपले विचार मांडले या निषेधार्थ सभेमध्ये माजी नगराध्यक्ष डॉ रजनी हजारे,  छाया मडावी, सुनंदा आत्राम, युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश नक्कावार, माजी नगर सेविका अंकुबाई भूक्या,रेखा रामटेके, छाया शेंडे, कावेरी, महिला तालुका अध्यक्ष अफसाना सय्यद, दिलीप माकोडे. भास्कर माकोडे, कासीम शेख, आफताब, डॉ कुल्दीवार, आनंद वीरय्या, प्रानेश अमराज, सतीश करमनकर, महेबुबखान पठाण, महेश जीवतोडे, साजिदभाई, गोविंदा उपरे असलमभाई,  फारूकभाई, ताहेर हुसेन, पाटील, ऍड सय्यद, नरसिंग रेब्बावर, सुरेश बोपनवार, बाबूभाई, अजहर भाई, रमेश देरकर, अखिल गेडाम, मुरली बुरांडे, नाना बुंदेल, रवी कोडापे, नरेश मुंधडा, कार्तिक जीवतोडे, व इतर कार्यकर्ते हजर होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)