नवी दिल्लीतील ' सेंट्रल विस्टा ' नंतर अयोध्येतील राम मंदिरातील दाराना लागतील चंद्रपुरातील उच्च प्रतिचे सागवान लाकूड - मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, वन व सांस्कृतिक मंत्री (After the 'Central Vista' in New Delhi, the doors of the Ram temple in Ayodhya will be covered with high quality teak wood from Chandrapur - Hon. Sudhirbhau Mungantiwar, Minister of Forests and Culture)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- दिल्ली येथील सेंट्रल व्हिस्टा पाठोपाठ अयोध्येतील राम मंदिरासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उच्च प्रतिचे सागवान लाकूड पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वन अकादमी येथे आयोजित ३५ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन कार्यक्रमानंतर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट जंगल, या जंगलात वास्तव्याला असलेले २०३ वाघ, बिबट, हरीण, चितळ, सांबर पाठोपाठ विविध पक्षी, फुलपाखरू वन्यजीव व पक्षी अभ्यासकांसाठी आकर्षणाचे व अभ्यासाचे केंद्र ठरले आहे. त्यासोबतच देशासोबतच जागतिक पर्यटक देखील या जिल्ह्याकडे आकर्षित झाला आहे. या सर्वांपाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील मौलिक सागवान देखील देशातील अनेक आकर्षक व देखण्या इमारतींमध्ये वापरले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेतून दिल्ली येथे आकाराला येत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा या इमारतीत चंद्रपूरचे उच्च प्रतिचे सागवान वापरण्यात आले आहे. आता तर अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिरात देखील चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान वापरण्यात येणार आहे. लवकरच या सागवानाची निवड करण्यासाठी अयोध्येतून एक चमू चंद्रपूरला येणार आहे. राम मंदिराचे काम असल्याने त्यासाठी अतिशय माफक दरात हे सागवान उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. राम मंदिराचे महाद्वार तथा मंदिरातील इतर अनेक ठिकाणी चंद्रपूरचे सागवान वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे सागवान अतिशय उच्च प्रतिचे आहे. मंदिरात ठिकठिकाणी या सागवानाचा वापर होणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)