अबब ! एकाच झाडावर 300 पेक्षा जास्त प्रजातीचे आंबे, उत्तरप्रदेशातील लखनऊ मधील मलिहाबाद चौकातील झाड लक्ष वेधतेय (Abba! More than 300 species of mangoes on a single tree, the tree at Malihabad Chowk in Lucknow, Uttar Pradesh is attracting attention.)

Vidyanshnewslive
By -
0

अबब ! एकाच झाडावर 300 पेक्षा जास्त प्रजातीचे आंबे, उत्तरप्रदेशातील लखनऊ मधील मलिहाबाद चौकातील झाड लक्ष वेधतेय (Abba!  More than 300 species of mangoes on a single tree, the tree at Malihabad Chowk in Lucknow, Uttar Pradesh is attracting attention.)

वृत्तसेवा :- वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतात. पण तुम्हाला वेगवेगळे आंबे एकाच ठिकाणी किंबहुना एकाच झाडावर खायला मिळाले तर. वाचूनच आश्चर्य वाटेल, किंबहुना यावर विश्वास बसणार नाही, हे शक्यच नाही असं तुम्ही म्हणाल. पण जगात असं आंब्याचं अनोखं झाड आहे. हे एकमेव असं झाड भारतातच आहे. आंब्याच्या या एका झाडावर 300 पेक्षा जास्त प्रकारचे आंबे येतात. सर्व आंबे रंग, रूप, आकार, चवीने एकमेकांपेक्षा वेगळे असतात. 83 वर्षांचे हाजी कलीम उल्लाख खान यांनी अशा आंब्याच्या झाडाची लागव़ड केली आहे. जगभरात ते मँगो मॅन म्हणून ओळखले जातात. 2008 साली त्यांना यासाठी पद्मश्रीही मिळाला होता. त्यानंतर 1987 साली त्यांनी पुन्हा असं झाड उगवलं, ज्यावर आता कित्येक वर्षांपासून 300 पेक्षा जास्त प्रकारचे आंबे लागतात. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा या झाडावर 13 प्रकारचे आंबे एकत्र आले. यंदा आणखी 20-25 नव्या प्रकारचे आंबे येण्याचा दावाही त्यांनी केला आहे. मोहराने हे झाड बहरलं असून जुलैपर्यंत या झाडावर आंबे येतील. या झाडांवरील आंब्याची विक्री होत नाही. हे आंबे लोकांना वाटले जातात, एकही आंबा विकला जात नाही, असं हाजी यांनी सांगितलं. शिक्षणात त्यांचं मन लागत नव्हतं, त्यामुळे ते सातवीपर्यंतच शिकले. त्यानंतर त्यांनी वडिलांसोबत नर्सरीमध्ये काम सुरू केलं. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा ग्राफ्टिंगमार्फत असं झाड उगवलं, ज्यावर 7 प्रकारचे आंबे येत होते. पण ते झाड अति पावसामुळे खराब झालं. या झाडावर अभ्यास होणं गरजेचं आहे. रिसर्च केल्यास एड्स, कॅन्सरसारख्या आजारावरील उपचारही या झाडावरील आंब्यातून मिळेल, असाही दावा त्यांनी केला आहे. आता असं झाड आहे कुठे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. उत्तर प्रदेशच्या लखनऊपासून काही अंतरावर असलेल्या मलिहाबाद चौकात हे झाड आहे. चार एकर परिसरात ही आंब्याची बाग आहे. या चमत्कारी झाडाचं रहस्य जाणून घेण्यासाठी जपानची टीमही इथं आली होती. त्यांनी या कलेबाबात माहिती करून घेतली. अमेरिकेनेही या झाडाबात बरीच माहिती मिळवली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)